शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या चार नेत्यांची कोल्हापूर जिल्ह्यात लागणार कसोटी; महापालिका, जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:26 IST

चारही नेत्यांची कामकाजाची पद्धत, स्वभाव पूर्णपणे भिन्न

कोल्हापूर : विधानसभेला घवघवीत यश मिळवणाऱ्या महायुतीच्या स्थानिक नेत्यांवर आता नवी जबाबदारी पडली आहे. येणाऱ्या कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका, जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीवर महायुतीची सत्ता यावी यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे यांना जोडण्या घालाव्या लागणार आहेत. महायुतीची मदार या चार नेत्यांवर राहणार आहे.या चारही नेत्यांची कामकाजाची पद्धत, स्वभाव पूर्णपणे भिन्न आहे. मुश्रीफ, कोरे विरुद्ध पाटील, आबिटकर असे राजकारण महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असताना रंगले होते. अजित पवार महायुतीत आल्यापासून मुश्रीफ हे महायुतीचे नेते झाल्याने आता राजकारणाचे संदर्भ बदलले आहेत.एकाच ठिकाणी महायुतीचेच अधिकाधिक उमेदवार इच्छुक असेल त्या ठिकाणी मात्र या नेत्यांची कसोटी लागणार आहे. खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांची आणि राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील यड्रावकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, अशोकराव माने, शिवाजी पाटील यांची त्या त्या मतदारसंघात महत्त्वाची भूमिका असेल.

हसन मुश्रीफनिवडणूक जिंकण्यासाठी कधी, कशा जोडण्या घालायचे हे मंत्री मुश्रीफ यांना चांगले अवगत आहे. महायुतीला दिशा देण्यामध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतील. अडचणीच्या काळात नेमका मार्ग काढण्याची त्यांची हातोटी आहे. मुश्रीफ हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जिल्ह्यातील एकखांबी तंबू आहेत. त्यामुळे झटपट निर्णय घेण्यात ते माहिर आहेत.

चंद्रकांत पाटीलमंत्री चंद्रकांत पाटील हे जरी पुण्यातून निवडून आले असले तरी अजूनही कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचा सल्ला घेतला जातो. कोल्हापुरात तर ते भाजपच्यावतीने निर्णायक भूमिका घेतात.

प्रकाश आबिटकरशिंदेसेनेची जबाबदारी मुख्यत: पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर राहील. त्यांच्यासह शिंदेसेनेचे तीन आमदार जिल्ह्यात असून, राजेंद्र पाटील यड्रावकरही शिंदेसेनेसोबतच आहेत. या सर्वांना विश्वासात घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्यांना झटावे लागेल.

विनय कोरेचार तालुक्यांचे राजकारण करतानाही विनय कोरे यांनी जिल्हास्तरीय अनेक संस्थांमध्ये जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. स्पष्ट भूमिका मांडणारे म्हणून कोरे महायुतीमध्ये निर्णायक भूमिका बजावू शकतात.