शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

बंडखोर बिघडविणार दिग्गज उमेदवारांचे गणित, माघारीसाठी यंत्रणा सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 16:20 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : विधानसभेच्या मागील निवडणुकीत अपक्षांनी ‘चंदगड’सह पाच मतदारसंघांत दिग्गजांचे विजयाचे गणित बिघडवले होते. त्याचा धसका या ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : विधानसभेच्या मागील निवडणुकीत अपक्षांनी ‘चंदगड’सह पाच मतदारसंघांत दिग्गजांचे विजयाचे गणित बिघडवले होते. त्याचा धसका या निवडणुकीत घेतला असून बंडोबांना थंड करण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. माघारीसाठी ४ नोव्हेंबरची मुदत असली तरी विविध मार्गाने त्यांची मनधरणी सुरू केली आहे.‘चंदगड’मध्ये राजेश पाटील हे ४३८५ मताधिक्याने विजयी झाले, पण अपक्ष शिवाजी पाटील यांनी दुसऱ्या क्रमाकांची मते तर रमेश रेडेकर यांनी १० हजार मते घेतली. त्यांनी शिवसेनेचे संग्राम कुपेकर व जनसुराज्य पक्षाचे अशोक चराटी यांचे गणित बिघडवले.‘राधानगरी’मध्ये प्रकाश आबीटकर हे १८ हजार ४३० इतक्या मताधिक्याने दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले. येथे अरुण डोंगळे, राहुल देसाई, चंद्रकांत पाटील, जीवन पाटील, सत्यजीत जाधव या तुल्यबळ अपक्षांनी ४४ हजार ८२६ मते घेतली.‘कागल’मध्ये राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ तर शिवसेनेकडून संजय घाटगे रिंगणात होते. येथे समरजीत घाटगे यांनी अपक्ष उभे राहून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली.‘हातकणंगले’ येथे राजू आवळे हे ६७७० च्या मताधिक्याने पहिल्यांदाच विधिमंडळात गेले. पण, येथे १७ पैकी ९ अपक्ष रिंगणात होते. या सगळ्यांना तब्बल १३ हजार मते मिळाली.

‘नोटा’च राहिला तिसऱ्या क्रमांकावरमागील निवडणुकीत दहा विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये तब्बल ३०३९ मते ‘नोटा’ला मिळाली. विशेष म्हणजे राजकीय पक्षांसह अपक्ष असे ९ जण रिंगणात होते, मात्र ‘नोटा’च तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

इचलकरंजी’, ‘शिरोळा’त अपक्षांचीच बाजीइचलकरंजीत मागील निवडणुकीत पंधरा पैकी तब्बल ८ उमेदवार अपक्ष रिंगणात होते. त्यापैकी प्रकाश आवाडे यांनी भाजप, काॅंग्रेससह इतर पक्षांच्या उमेदवारांना चितपट केले. ‘शिरोळ’मध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर हे अपक्ष म्हणून सामोरे गेले आणि २७ हजार ८२४ चे मताधिक्य घेऊन शिवसेनेचे उल्हास पाटील, ‘स्वाभिमानी’चे सावकार मादनाईक यांचा पराभव केला.

मतदारसंघनिहाय अपक्षांनी घेतलेली मते..मतदारसंघ  - अपक्ष - मते

  • चंदगड -  ९ -  ७३,०२५
  • राधानगरी  - ७  - ४४,९७४
  • कागल  - २  - ८९,१२८
  • कोल्हापूर दक्षिण - ३  - ८९८
  • करवीर - १  - ३६७
  • कोल्हापूर उत्तर - ३  - १,७८२
  • शाहूवाडी - ५  - ३,२०४
  • हातकणंगले  -  ९ -  १३,०४९
  • इचलकरंजी - ८   - १,१९,१०६ 
  • शिरोळ  - ४  - ९३,८८९ 
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणkagal-acकागलichalkaranji-acइचलकरंजीPoliticsराजकारणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024