शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
2
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
3
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
4
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
5
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
6
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
7
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
8
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
9
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
10
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
11
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
12
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
13
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
14
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
15
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
16
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
17
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
18
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
19
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
20
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार अजितदादांचे, सर्वांत कमी शरदकाकांचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 19:03 IST

काँग्रेस, भाजपचीही स्वबळ दाखवताना दमछाक

कोल्हापूर : जिल्ह्यातील तेरा नगरपालिका व नगरपंचायतींसाठी बुधवारी चिन्हांचे वाटप केले असून, सर्वाधिक पाच नगराध्यक्षपदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे तर सर्वाधिक ८१ नगरसेवकपदाचे उमेदवार भाजपचे आहेत.

नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, भाजप, उद्धवसेना, जनसुराज्य पक्षाचे प्रत्येकी चार तर शिंदेसेनेच्या चिन्हावर दोन ठिकाणी उमेदवार उभे आहेत. त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी २३ अपक्ष तर तब्बल ४४३ जण नगरसेवकपदासाठी नशीब अजमावत आहेत.राज्यात सर्वच ठिकाणी नगरपालिका, नगरपंचायतींसाठी राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला महत्त्व असून, त्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आणण्याचा प्रयत्न आहे; पण स्थानिक कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी आघाड्या कराव्या लागल्या. त्यामुळेच सर्वाधिक नगरसेवकपदाचे उमेदवार हे आघाड्या व अपक्षांचे आहेत.

काँग्रेस, भाजपचीही स्वबळ दाखवताना दमछाककाँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांना तेरा नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार देता आलेले नाहीत. त्या तुलनेत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे एकमेव आमदार जिल्ह्यात असतानाही त्यांनी सर्वाधिक ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केले आहेत.उमेदवारीत शिंदेसेनेपेक्षा उद्धवसेना पुढेजिल्ह्यात एकही आमदार, खासदार नसताना उद्धवसेनेने नगराध्यक्षपदाचे ४ तर नगरसेवकपदासाठी ५६ उमेदवार उभे केले आहेत. त्या तुलनेत शिंदेसेनेचे दोन ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.नगरपालिका निवडणुकीत ‘तुतारी’ वाजणार का?राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्ह्यात अस्तित्वासाठी धडपड असल्याचे चित्र आहे. तेरा नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये एकाही ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करता आलेला नाही. हातकणंगले, शिरोळ व कुरुंदवाडमध्ये प्रत्येकी एका तर आजरा येथे तीन असे सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ‘तुतारी’ वाजणार का? हे पाहावे लागणार आहे.

नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचे पक्षीय उमेदवार असेपक्ष - नगराध्यक्ष (ठिकाणे) - नगराध्यक्ष - नगरसेवक 

  • राष्ट्रवादी (अजित पवार) - हुपरी, हातकणंगले, मिरगूड, गडहिंग्लज, कागल - ५ - ७८ 
  • भाजप - हुपरी, हातकणंगले, कुरुंदवाड, चंदगड - ४ - ८१ 
  • शिंदेसेना - हातकणंगले, मुरगूड - २ - ६२ 
  • उद्धवसेना - हुपरी, हातकणंगले, कागल, मलकापूर - ४ - ५६ 
  • काँग्रेस - हातकणंगले, कुरुंदवाड, कागल, आजरा - ४ - ५३ 
  • जनसुराज्य - पेठवडगाव, पन्हाळा, गडहिंग्लज, मलकापूर - ४ - ४५ 
  • राष्ट्रवादी (शरद पवार) - - - ० - ६ 
  • जनता दल - - - ० - ८ 
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Local Body Polls: Ajit Pawar Faction Leads in Candidates

Web Summary : In Kolhapur local body elections, NCP (Ajit Pawar) has most chairman candidates, BJP leads in corporators. Congress, Shiv Sena also compete. NCP (Sharad Pawar) lags behind.