शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा कारागृहात अधिकाऱ्यांकडून कोळीची झडती, कारागृहातच झाली होती मारहाण; तक्रार देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 11:31 IST

जुना राजवाडा पोलिसांनी कारागृह प्रशासनाकडून माहिती मागवली 

कोल्हापूर : ग्रोबझ मल्टिट्रेडिंग कंपनीद्वारे झालेल्या फसवणुकीतील संशयित आरोपी विश्वास निवृत्ती कोळी याला कळंबा कारागृहात काही तरुणांकडून मारहाण झाल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध करताच कळंबा कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले. कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२८) सकाळी कोळीची झडती घेऊन चौकशी केली, तसेच जुना राजवाडा पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून कारागृह प्रशासनाकडून माहिती मागवली.कमी कालावधीत दामदुप्पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ग्रोबझ कंपनीने गुंतवणूकदारांची सुमारे साडेनऊ कोटी रुपयांची फसवणूक केली. या गुन्ह्यातील संशयित विश्वास कोळी हा सध्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. शहरात ८ जूनला झालेल्या दंगलीनंतर काही तरुणांची कळंबा कारागृहात रवानगी झाली होती.त्यात ग्रोबझच्या काही गुंतवणूकदारांचा समावेश होता. संशयित कोळी आयताच कारागृहात सापडल्याने तरुणांनी मारहाण करीत त्याच्याकडे गुंतवलेल्या पैशांची मागणी केली. ९ आणि १० जूनला हा प्रकार घडला. कारागृहात कोळी मोबाइलचा वापर करीत असल्याची धक्कादायक माहिती तरुणांनी दिल्याने कारागृह प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.हा सर्व प्रकार 'लोकमत'ने उघडकीस आणल्यानंतर बुधवारी सकाळी तातडीने कारागृहातील उपअधीक्षक पांडुरंग भुसारे यांनी कोळीची झडती घेतली. त्याच्या बरॅकचीही तपासणी करण्यात आली. मात्र, त्याच्याकडे मोबाइल सापडला नाही. मारहाणीबद्दल त्याची काही तक्रार नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जुना राजवाडा पोलिसांकडून दखलजुना राजवाडा पोलिसांनी घटनेची दखल घेऊन बुधवारी सकाळी कारागृह अधीक्षकांशी संपर्क साधला. मारहाणीच्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती मागवल्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात सांगली येथील एका खूनप्रकरणी कळंबा कारागृहातील एक कैदी मोबाइलवरून हल्लेखोरांच्या संपर्कात होता, अशी माहिती मिळताच राजवाडा पोलिसांनी कारागृहाची झडती घेतली होती. कोळीच्या प्रकरणातही गरज पडल्यास कारागृहाची झडती घेतली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंग