शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

दुधाचे दर भडकले; दूध पावडर-बटरनेही घेतली उसळी, देशांतर्गत बाजारपेठ कडाडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 13:45 IST

महाराष्ट्रासह देशभरात पावडरची चणचण भासू लागली

राजाराम लोंढेकोल्हापूर : देशात दुधाचे उत्पादन आणि मागणी यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने दुधाचे दर भडकले आहेत. त्याचबरोबर दूध पावडर व बटरने ही उसळी घेतली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत सध्या दूध पावडरचा दर ३५० रुपये तर बटरचा ४५० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत किलो मागे तब्बल १०० रुपयांची वाढ झाली असून, ऐन सणासुदीच्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे.जगभरात ऑस्ट्रोलिया,न्यूझीलंड हे दूध उत्पादनातील मोठे देश आहेत. मात्र सध्या तिथे दुष्काळ सदृश स्थिती असल्याने अपेक्षित दूध उत्पादन झाले नाही. तिथे डिसेंबर-जानेवारी पासून दुधाचा लीन हंगाम सुरू होतो. या कालावधीत दूध उत्पादन कमी होते. त्यामुळे आगामी तीन-चार महिन्यात जागतिक बाजारपेठेत ही दूध पावडरचे दर कमी होण्याची शक्यताही धूसर आहे.

पावडरची चणचणदूध संघाकडे पावडर ठेवण्यासाठी जागा नसायची,मात्र यंदा एक किलोही पावडर विक्रीसाठी राज्यातील कोणत्याच संघाकडे नाही. त्यामुळे सध्या महाराष्ट्रासह देशभरात पावडरची चणचण भासू लागली आहे.

‘अमूल’ची मखलाशी

‘अमूल’ने महाराष्ट्रातील दूध व्यवसाय अस्थिर करण्याची रणनीती आखली आहे. त्यातूनच खरेदी व विक्री दरात मोठी वाढ केली. मात्र गुजरातमध्ये तुलनेत दर कमी आहेत. गुजरातमध्ये फेडरेशन रोज दीड कोटी लीटरचे दूध संकलन करते,तिथे दर वाढ न करता दोन लाख लीटर संकलन करणाऱ्या महाराष्ट्रात त्यांनी दरवाढ करण्याची मखलाशी केली आहे.

दुधात भेसळीची भीतीदुधाबरोबर पावडरची टंचाई भासू लागल्याने भेसळीची शक्यताही अधिक आहे. ग्राहकांनी भेसळीपासून सावध राहण्याची गरज आहे.

पावडर आयातीसाठी हालचाली

देशांतर्गत बाजारपेठेत दूध व दूध पावडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने सामान्य ग्राहकांमध्ये अस्वस्थता आहे. त्याचे पडसाद केंद्र सरकारमध्ये उमटू लागले आहेत. त्यामुळे पावडर आयात करता येईल का? याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

तर दूध दरवाढ ठरेल औटघटकेचीआयात धोरणामुळे देशांतर्गत बाजारपेठ अस्थिर झाली तर दूध व दूध पावडरच्या दरात मोठी घसरण होऊ शकते. त्यामुळे दुधाच्या दरात कपात करण्यापलीकडे दूध संघांच्या हातात काहीच राहणार नाही.

‘गोकुळ’च्या संकलनात घटगेल्या वर्षीच्या तुलनेत ‘गोकुळ’च्या दैनंदिन दूध संकलनात तब्बल १ लाख ४४ हजार लीटरची घट आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १४ लाख ३९ हजार लीटर संकलन होते.

ही आहेत कारणे -

  • कोरोनानंतर पुन्हा नव्या दमाने मार्केट खुले झाले आहे.
  • लम्पीमुळे दुभत्या जनावरे मृत्यूमुखी.
  • जनावरांचे बाजार बंद.
  • अपेक्षित दूध उत्पादनात वाढ नाही.
  • दूध मागणीत झालेली वाढ
टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूध