शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसानवरून महसूल-कृषीच्या वादात शेतकरी दाणीला, कोल्हापुरात मनसे आक्रमक 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 18, 2023 16:50 IST

मनसे कार्यकर्ते निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसले

कोल्हापूर : पीएम किसान योजनेचे काम कोणी करायचे या महसूल व कृषीमधील वादामुळे शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, करवीर, कागल, पन्हाळा व शाहुवाडी तहसिलदारांनी त्यांचे युजरआयडी जाणीवपूर्वक डिॲक्टिव्ह ठेऊन शेतकऱ्यांची कुचंबणा केली आहे असा आरोप करत मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसले. यामुळे पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये काही काळ झटापट झाली, तर आतमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्यासोबत वादावादी झाली. चर्चेनंतर कांबळे यांनी या विषयावर २० तारखेला बैठक बोलावली आहे.पीएम. किसान योजनेचे काम कोणी करायचे या महसूल व कृषीमधील वादातून जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील तहसिलदारांनी युजरआयडी डिॲक्टिव्ह ठेवले आहेत. या श्रेयवादावर शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी विश्वचषकाच्या आकारातील कटआऊट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी आणले होते.हे अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावर येऊन स्विकारावे असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, पण अर्ध्या तासानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते घोषणाबाजी करत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसले. दरम्यान पोली स व कार्यकर्त्यामध्ये झटापट झाली. कार्यकर्त्यांनी चषकाची प्रतिकृती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी स्विकारला नाही. तसेच दालनात घुसल्याने काबंळे व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMNSमनसेPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना