शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तरुणास गगनबावड्यात केली अटक, आई- वडिलांवरही गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 11:55 IST

संशयित मारुती हा नकुशाला वारंवार त्रास देत होता. तो तिच्याकडे बळजबरीने शरीरसुखाची मागणीही करीत होता

कोल्हापूर : बोंद्रेनगर येथील तरुणी नकुशा साऊ बोडेकर (वय १९) हिच्या आत्महत्येप्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित मारुती हरी बोडेकर (वय २४) याच्यासह त्याचे वडील हरी बाबू बोडेकर आणि आई विठाबाई हरी बोडेकर (सर्व रा. बोंद्रेनगर, फुलेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला. मारुती बोडेकर याला गुरुवारी (दि. १६) दुपारी गगनबावडा येथून अटक करण्यात आली.करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नकुशा हिने बुधवारी दुपारी आत्महत्या केल्याचे समजताच तिला त्रास देणारा संशयित मारुती बोडेकर हा गगनबावड्याला गेला होता. तर त्याचे आई- वडीलही घराला कुलूप लावून निघून गेले होते. पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून मारुती बोडेकर याचा शोध घेऊन गुरुवारी दुपारी त्याला गगनबावडा येथून अटक केली. त्याच्या आई- वडिलांचा अद्याप शोध लागला नसल्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले.संशयित मारुती हा नकुशाला वारंवार त्रास देत होता. तो तिच्याकडे बळजबरीने शरीरसुखाची मागणीही करीत होता. याच वादातून मारुती आणि त्याच्या आई- वडिलांनी नकुशाला धमकावले होते. आपल्यामुळे आईला त्रास होईल या काळजीने नकुशाने स्वत:चे जीवन संपवले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मनिषा नारायणकर करीत आहेत.बैठकीत तोडगा नाहीचनकुशा आणि मारुती यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी बोंद्रेनगर परिसरातील काही ज्येष्ठ नागरिकांची चार दिवसांपूर्वी बैठक झाली. त्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. उलट त्यानंतरही संशयितांनी नकुशाला धमकावले, अशी माहिती परिसरातील काही नागरिकांनी पोलिसांना दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस