कोल्हापूर : महापालिकेजवळील माळकर तिकटी परिसरात कार लावण्याच्या कारणावरून आणि जिलेबी महिला कामगाराने शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाने तलवार काढून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री पावणेआठ वाजता ही घटना घडली. भररस्त्यात चारचाकीच्या डिकीतून तलवार काढून दहशत माजवल्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. त्या तरुणाने तुला मी कोण आहे दाखवितो, असे म्हणत पंचवीसहून अधिक तरुणांना त्या ठिकाणी बोलावून घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांनी तलवार, चारचाकी गाडीसह त्या तरुणाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, टेंबलाईवाडी परिसरातील एक कुटुंब मसाला खरेदीसाठी माळकर तिकटी परिसरात आले. त्यांनी रत्नागिरी पासिंग असलेली चारचाकी वाहन माळकर तिकटी येथील जिलेबी विक्रीच्या दुकानासमोर पार्क केली. अर्धा तासानंतर ते त्या ठिकाणी आले. त्यावेळी एक महिला विक्रेता आणि त्या तरुणात शाब्दिक चकमक झाली. महिलेने शिवीगाळ केल्याने तरुण अधिकच संतप्त झाला. त्याने कारच्या डिकीमधील तलवार काढत थांबा, आता मी कोण आहे तुला दाखवतोच, असे म्हणत तलवारीने दहशत माजविली. त्यामुळे विक्रेते घाबरून गेले. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. तलवार नाचविल्याने नागरिकही घाबरून गेले. घडलेला हा प्रकार काही नागरिकांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना कळविला.पोलिस त्या ठिकाणी तत्काळ दाखल झाले. त्यांनी त्या तरुणाला आणि चारचाकी ताब्यात घेतली. तलवारही जप्त केली. तोपर्यंत त्या तरुणाने फोन करून बोलवलेले २५हून अधिक तरुणही त्या ठिकाणी आले. ते दहशत माजविण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांना पाहताच त्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे वेळीच पुढील अनर्थ टळला.
कार जरा पुढे घ्याजिलेबी विक्रीच्या दुकानातील महिला कामगाराने त्या चालकाला कार पुढे घ्या. हे पार्किगचे ठिकाण नाही, असे म्हणताच त्या तरुणाचा राग अनावर झाला. कारमध्ये बसलेल्या महिलांनीही त्या महिला कामगारांना जाब विचारला. महिलांत वादावादी सुरू झाली. सुमारे पाच मिनिटे हा प्रकार सुरू होता. दुकान मालकाने हा वाद थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्या तरुणाने तलवार काढून दहशत माजविली.
तासाभरापूर्वीच संचलनप्रत्येक पोलिस ठाण्याने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर संवेदशील भागात सशस्त्र संचलन केले. संचलन संपल्यानंतर पावणेआठ वाजेच्या सुमारास महापालिकेजवळ माळकर तिकटी येथील दुकानासमोरच हा प्रकार घडला. त्यामुळे या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
पोलिस ठाण्यासमोरही गर्दीजिलेबी विक्रीच्या दुकानातील महिला कामगार आणि त्या तरुणाच्या नातेवाइकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली. मात्र, पोलिसांनी गर्दीला पांगविले.
Web Summary : In Kolhapur, a youth brandished a sword after arguing with a shopkeeper over parking. He threatened her for scolding him, escalating tensions. Police intervened, seizing the sword and vehicle, preventing further violence as the situation calmed down.
Web Summary : कोल्हापुर में पार्किंग को लेकर विवाद के बाद एक युवक ने तलवार लहराकर दहशत फैला दी। उसने महिला दुकानदार को धमकाया, जिससे तनाव बढ़ गया। पुलिस ने हस्तक्षेप कर तलवार और वाहन जब्त कर लिया, जिससे आगे हिंसा टल गई और स्थिति शांत हो गई।