सुधारित .. दुधाळी परिसरात दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:22 IST2021-03-06T04:22:04+5:302021-03-06T04:22:04+5:30

कोल्हापूर : एकमेकांकडे बघितल्याच्या कारणावरून दुधाळी परिसरात दोन गटांत हाणामारी झाली. त्यात एका युवकाने बंदूक बाहेर काढल्याची माहिती पोलिसांना ...

Improved .. Fighting between two groups in Dudhali area | सुधारित .. दुधाळी परिसरात दोन गटांत हाणामारी

सुधारित .. दुधाळी परिसरात दोन गटांत हाणामारी

कोल्हापूर : एकमेकांकडे बघितल्याच्या कारणावरून दुधाळी परिसरात दोन गटांत हाणामारी झाली. त्यात एका युवकाने बंदूक बाहेर काढल्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. चौकशीत ही बंदूक खेळण्यातील प्लास्टिकची असल्याचे पुढे आले.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, लक्षतीर्थ वसाहतीमधील दोन महाविद्यालयीन युवकांमध्ये वादावादी व त्यातून हाणामारी झाली होती. त्याचे पडसाद गुरुवारी दुपारी उमटले. याच रागातून दुधाळी परिसरात दोन गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यांच्यात लाथाबुक्क्यांनी हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये गोंधळ माजला. यातील एका सजग नागरिकाने पोलिसांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. त्यामुळे दोन्ही गटातील तरुणांनी पोलिसांना पाहून पलायन केले. त्यांना पकडून पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

Web Title: Improved .. Fighting between two groups in Dudhali area