महत्त्वाची : आरक्षण ठरले, आता पत्ते खोलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:20+5:302020-12-22T04:23:20+5:30
कोल्हापूर : आरक्षण जाहीर झाल्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीला आता खऱ्याअर्थाने रंगत आली आहे. इच्छुकांनी सोमवारी दुपारनंतरच प्रचाराला सुरुवात केली. इच्छुकांनी ...

महत्त्वाची : आरक्षण ठरले, आता पत्ते खोलणार
कोल्हापूर : आरक्षण जाहीर झाल्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीला आता खऱ्याअर्थाने रंगत आली आहे. इच्छुकांनी सोमवारी दुपारनंतरच प्रचाराला सुरुवात केली. इच्छुकांनी सोशल मीडियावर प्रभागाचे नाव आणि छायाचित्र व्हायरल केले. समर्थकांकडूनही त्यांना कमेंट करण्यात आली. काहींनी तर प्रभागातील महत्त्वाच्या व्यक्तींना फोन करून, प्रभागातून निवडणूक लढविणार असून सहकार्याची अपेक्षा असल्याचे सांगितले.
महापालिका निवडणुकीसाठी प्रभागाचे आरक्षण सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास जाहीर झाल्यानंतर ८१ प्रभागातील चित्र स्पष्ट झाले. काहींचा पत्ता कट झाल्यामुळे त्यांनी शेजारील प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. इच्छुकांनी सोमवारी दुपारी आरक्षण जाहीर होताच थेट उमेदवारीच जाहीर केली. सोशल मीडियावरून यासंदर्भातील संदेश सर्वांपर्यंत पाेहोचवण्याचे काम समर्थकांमार्फत सुरु करण्यात आले. काहींनी महापौरपद डोळ्यासमोर ठेवून पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने हालचालीही सुरु केल्या.
खिसा रिमाका करावा लागणार
गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरु होती. काहींनी प्रभागात चाचपणी सुरु केली होती. मात्र, ते आरक्षणाच्या प्रतीक्षेत होते. हात आखडतच त्यांच्याकडून जनसंपर्क सुरु होता. आता आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुकांना पत्ते खोलावे लागणार असून, खिसा रिकामा करावा लागणार आहे.
चौकट
महापौर पदाची संधी असणारे प्रभाग...
प्रभाग क्रमांक १३ : रमणमळा, प्रभाग क्रमांक १५ कनाननगर, प्रभाग २१ टेंबलाईवाडी, प्रभाग २४ साईक्स एक्स्टेन्शन, प्रभाग ३६ राजारामपुरी, प्रभाग ४९ रंकाळा स्टँड, प्रभाग ५२ बलराम कॉलनी, प्रभाग ५३ दुधाळी पॅव्हेलियन, प्रभाग ५६ संभाजीनगर बसस्थानक, प्रभाग ६४ शिवाजी विद्यापीठ, प्रभाग ७१ रंकाळा तलाव.
बातमीदार : विनोद