महत्वाचे संक्षिप्त वृत्त -सांस्कृतिक १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:28 IST2021-01-16T04:28:35+5:302021-01-16T04:28:35+5:30

कोल्हापूर : राज्य नृत्य परिषदेचे पहिले पश्चिम महाराष्ट्र विभागीय संमेलन रविवारी (दि.१७) गडकरी हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता होणार आहे. ...

Important Brief News - Cultural 1 | महत्वाचे संक्षिप्त वृत्त -सांस्कृतिक १

महत्वाचे संक्षिप्त वृत्त -सांस्कृतिक १

कोल्हापूर : राज्य नृत्य परिषदेचे पहिले पश्चिम महाराष्ट्र विभागीय संमेलन रविवारी (दि.१७) गडकरी हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता होणार आहे. यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर येथील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते संमेलनाचा शुभारंभ होईल. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित असतील. यावेळी पश्चिम विभागीय समितीचा पदग्रहण समारंभ होणार आहे, तसेच भूपेश मेहेर, जतीन पांडे व दीपक बीडकर, डॉ. विनोद निकम मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे नियोजन सागर बगाडे करीत आहेत.

--

अनिकेत मोहिते यांना फेलोशिप

कोल्हापूर : कॅनडा येथील ब्रिटिश कोलंबिया कॅन्सर सेंटर व व्हॅनकोअर कोस्टल हेल्थ डिपार्टमेंटच्या वतीने अयाोजित बोनमॅरो पदव्युत्तर परीक्षेत डॉ. अनिकेत बाळासाहेब मोहिते यांनी फेलोशिप इन बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही पदवी प्राप्त केली.

मोहिते हे कोल्हापूर कॅन्सर सेंंटर येथे प्रौढ, बाल रक्तविकार व अस्थिमज्जा फिजिशियन म्हणून कार्यरत असून, अतिशय गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार केले आहेत. त्यांनी यापूर्वी टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटरच्या वतीने घेण्यात आलेल्या अस्थिमज्जा प्रत्यारोपण प्रशिक्षण परीक्षेत फेलोशिप इन बोन मॅरो ही पदवीही सर्वोच्च गुणांनी प्राप्त केली आहे.

--

फोटो नं १५०१२०२१-कोल-अनिकेत मोहिते

--

Web Title: Important Brief News - Cultural 1