महिला व बालकांसाठीच्या योजना सक्षमपणे राबवा :जिल्हाधिकारी दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 18:45 IST2021-02-23T18:43:31+5:302021-02-23T18:45:10+5:30
women and child development Collcator Kolhapur-महिला आणि बालकांसाठीअसणाऱ्या वैयक्तिक व सामुहिक योजनांकरिता जेंडर बजेट प्रमाणे योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी या विभागातील अधिकाऱ्यांना बजावले.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी डॉ. प्रमिला जरग, सोमनाथ रसाळ, सुजाता शिंदे, बी. जी. काटकर यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर : महिला आणि बालकांसाठीअसणाऱ्या वैयक्तिक व सामुहिक योजनांकरिता जेंडर बजेट प्रमाणे योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी या विभागातील अधिकाऱ्यांना बजावले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे, परिविक्षा अधिकारी बी.जी.काटकर, महिला व बाल विकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनिता नाशिककर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी म्हणाले, स्वतंत्रपणे प्रत्येक विभागाने महिला सक्षमीकरणासाठी काय केले आहे याची माहिती घ्यावी. काय करणे अपेक्षित आहे याबाबत पत्रक पाठवावे. याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा.
यावेळी हुंडा पध्दतीच्या विरोधात जनजागृती व सहाय्य संबधाने करण्यात आलेली कार्यवाही, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंमलबजावणीबाबतची कार्यवाही, महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर करण्यात आलेली कार्यवाही, देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी समुदाय यांच्या सामाजिक समावेशनासाठी करण्यात आलेली कार्यवाहीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे, शशिकला बोरा, डॉ. प्रमिला जरग, सुनिता गाठ, अर्चना प्रार्थरे, प्रिती घाटोळे उपस्थित होत्या.