शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तोतया आयकर अधिकाऱ्यांनी चहावाल्याच्या घरातून ४५ हजार लुटले, व्यापारी वर्गात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 18:55 IST

तुम्ही शासनाचा कर चुकवून भरपूर पैसे कमावले आहेत असे म्हणत दरवाजे बंद करून मोबाईल काढून घेत घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकले

गांधीनगर: आयकर अधिकारी असल्याचा बहाणा करून अज्ञात चार ते पाच जणांनी एका चहावाल्याच्या घरातून ४० ते ४५ हजार रुपये लुटण्याचा प्रकार गांधीनगरमध्ये सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, रेल्वे स्टेशन रोडवर एका चहावाल्याची टपरी आहे. सेंट्रल पंचायतीच्या मागील बाजूस एका साध्या घरामध्ये त्या चहा टपरीवाल्याचे वास्तव्य आहे. सोमवारी एक महिला आणि तीन अज्ञातांनी आम्ही आयकर अधिकारी आहोत असे सांगून घरात शिरले. घरामध्ये एक महिला आणि त्यांचा मुलगा असे दोघे होते. अचानक तीन ते चार जण घरामध्ये येऊन तुम्ही टॅक्स भरता का, आम्हाला तुमचे घर तपासायचे आहे. तुम्ही प्रचंड पैसे मिळवलेले आहेत. तुम्ही शासनाचा कर चुकवून भरपूर पैसे कमावले आहेत असे म्हणत दरवाजे बंद करून मोबाईल काढून घेत घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकले आणि घरातील कपाटामधील ४० ते ४५ हजार रुपये घेऊन पसार झाले. हा प्रकार अर्धा ते पाऊण तास सुरू होता. या घटनेमुळे गांधीनगर भागात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यात कोणतीही या घटनेची नोंद केली नाही. पोलिसांचा चौकशीचा ससेमिरा उगाच नको म्हणून या घटनेची नोंद किंवा तक्रार पीडित कुटुंबीयांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली नाही, असे सूत्राकडून समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIncome Taxइन्कम टॅक्सCrime Newsगुन्हेगारी