कोल्हापूर शहरात दुपारनंतर दूध विक्रीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 12:47 PM2020-11-02T12:47:25+5:302020-11-02T12:48:38+5:30

MIlk, GokulMilk, Kolhapurnews कोल्हापूर शहरात दुपारनंतर दूध विक्रीवर परिणाम होत आहे. गोकुळ दूध संघाने दूध केंद्र चालकांच्या पैसे जमा करण्याच्या वेळेत बदल केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

Impact on afternoon milk sales in Kolhapur city | कोल्हापूर शहरात दुपारनंतर दूध विक्रीवर परिणाम

कोल्हापूर शहरात दुपारनंतर दूध विक्रीवर परिणाम

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर शहरात दुपारनंतर दूध विक्रीवर परिणामसकाळी पैसे जमा करणाऱ्यांनाच दुपारनंतर दूध

कोल्हापूर : शहरात दुपारनंतर दूध विक्रीवर परिणाम होत आहे. गोकुळ दूध संघाने दूध केंद्र चालकांच्या पैसे जमा करण्याच्या वेळेत बदल केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

विक्रेत्यांना यापूर्वी दुपारच्या दुधाची ऑर्डर सकाळी साडेअकरापर्यंत देऊन मागणी केलेल्या दुधाची रक्कम दुपारी दोन वाजेपर्यंत संघाच्या खात्यामध्ये भरण्याची मुभा होती. शनिवारपासून सकाळी ११ पर्यंत पैसे जमा करणाऱ्यांनाच दुपारनंतर दूध वितरण केले जात आहे.

मुळातच सकाळच्या सत्रात दूध वितरण करून पैसे गोळा करण्यास सकाळी ११ वाजत असल्याने त्यांना यावेळेत पैसे जमा करणे शक्य होत नाही. त्यामुळे दुपारच्या दूध बिल जमा करण्याच्या निर्णयाबाबत फेरविचार करावा, अशी मागणी दूध केंद्रचालक असोसिएशनचे अध्यक्ष सागर साळोखे यांनी केली आहे.

Web Title: Impact on afternoon milk sales in Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.