शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात तेरा तास चालला विसर्जन मिरवणूक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 14:25 IST

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर याह्ण अशी साद घालत गुरुवारी सातारा शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मानाच्या व शेवटच्या शंकर-पार्वती गणेशमूर्तीचे सकाळी विसर्जन केल्यानंतर साताऱ्याचा मिरवणूक सोहळा संपन्न झाला. हा सोहळा तब्बल तेरा तास रंगला.

ठळक मुद्देसाताऱ्यात तेरा तास चालला विसर्जन मिरवणूक सोहळाबाप्पांच्या निरोपाला जलधाराही बरसल्या

सातारा : गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर याह्ण अशी साद घालत गुरुवारी सातारा शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मानाच्या व शेवटच्या शंकर-पार्वती गणेशमूर्तीचे सकाळी विसर्जन केल्यानंतर साताऱ्याचा मिरवणूक सोहळा संपन्न झाला. हा सोहळा तब्बल तेरा तास रंगला.सातारा पालिकेच्या वतीने बुधवार नाक्यावर उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावासह जलतरण तलाव, हुतात्मा स्मारक, दगडी शाळा व कल्याणी शाळा येथील तळ्यात मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. गुरुवारी सकाळपासूनच घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचा विसर्जन सोहळा सुरू झाला.

अनेकांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक काढली. सायंकाळी चार वाजता मुख्य विसर्जन मिरवणूक सोहळा सुरू झाला. राजवाड्यावरून सुरू झालेली मिरवणूक मोती चौक, देवी चौक, शेटे चौक, सम्राट चौक, प्रतापगंज पेठ मार्गे बुधवार नाक्यावरील विसर्जन तळ्याकडे मार्गस्थ झाली.गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत भाविकांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. पालिकेच्या वतीने कृत्रिम तळ्यावर विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था केली होती. विसर्जन मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या व्यतिरिक्त ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले होते. त्यामुळे मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनSatara areaसातारा परिसर