शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी तातडीने पावले उचलू - जिल्हाधिकारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 12:30 IST

पुजाऱ्यांना सूचना, दर १५ दिवसांनी बैठक

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने राज्य पुरातत्व विभागाकडून मूर्तीची पाहणी करून घेतली होती. त्याचा अहवाल समितीला सादर झाला आहे. यासह दोन दिवस न्यायालयीन आदेशाने मूर्तीची पाहणी झाली आहे. समितीला आलेला अहवाल व तज्ज्ञांच्या अहवालातील सूचनांनुसार मूर्तीचे तातडीने संवर्धन केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी दिली.अंबाबाई मूर्तीची शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगिराज यांनी मूर्तीची पाहणी केली. यावेळी स्वत: जिल्हाधिकारी अमोल येडगे, पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वाहने यांच्यासह ॲड. प्रसन्न मालेकर, दिलीप देसाई यांच्यासह वादी-प्रतिवादी उपस्थित होते. तज्ज्ञांचा अहवाल २५ तारखेला न्यायालयाला सादर होणार आहे. यावर ४ एप्रिल रोजी सुनावणी होईल.

याबाबत जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, देवस्थान समितीने काही महिन्यांपूर्वी अंबाबाई मूर्तीची राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करून घेतली होती. त्यांचा अहवाल समितीला मिळाला आहे. त्या अहवालानुसार मूर्तीचे जतन संवर्धन करण्यात येईल. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेद्वारेदेखील गेले दोन दिवस मूर्तीची पाहणी झाली आहे. त्यांचा अहवाल न्यायालयात सादर होईल. या दोन्ही अहवालातील निष्कर्षानुसार अंबाबाई मूर्तीचे जतन संवर्धन केले जाईल.

पुजाऱ्यांना सूचना, दर १५ दिवसांनी बैठकजिल्हाधिकारी येडगे म्हणाले, शुक्रवारी केंद्रीय पुरातत्व खात्याचे अधिकारी कोल्हापुरात आले होते. त्यांच्याशीदेखील मूर्तीबाबत चर्चा झाली असून, त्यांनी संवर्धनाबाबत सकारात्मकता दाखवली आहे. मूर्तीची काळजी घेण्यासाठी पूजाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. दर १५ दिवसांनी बैठक घेऊन मूर्तीबाबत आढावा घेतला जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर