शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आव्हानाला घाबरणारा मी नाही, सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांचे आव्हान धुडकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 12:03 IST

'उद्या कोण माझ्या स्टेजवर असेल सांगता येत नाही'

कोल्हापूर : मी तुमच्या आव्हानाला घाबरणारा नाही. जर तीन महिन्यांपूर्वी आव्हान दिले असते तर त्याला उत्तर दिले असते. आमच्या महाविकास आघाडीच्या चर्चा, निर्णय आता पुढे गेले आहेत. लोकसभेची ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. जनता विरुद्ध महायुती अशा होणाऱ्या निवडणुकीत तुमच्या आव्हानाचे उत्तर मिळेल, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे आव्हान धुडकावून लावले.महाविकास आघाडीने सामूहिकपणे श्रीमंत शाहू छत्रपती यांना काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शाहू छत्रपतींच्या उमेदवारीचा विषय बराच पुढे गेला आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी जर मला आव्हान दिले असते तर त्याला जरूर उत्तर दिले असते. सतेज पाटील असल्या आव्हानांना घाबरणारा नाही, असे पाटील यांनी सांगितले.हातकणंगले मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल असे विचारता पाटील यांनी याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असे स्पष्ट केले. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यावा का, याची चर्चा आघाडीच्या बैठकीत झाली आहे. परंतु याबाबत अजून निर्णय झालेला नाही. शिवसेना ठाकरे गटाला ही जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. ते अंतिम निर्णय घेतील असे चर्चेतून ठरले आहे, असेही त्यांनी सांगितले.उद्या कोण माझ्या स्टेजवर असेल सांगता येत नाहीसंजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत छेडले असता, त्यांच्या उमेदवारीबाबत मी काय सांगणार, असे म्हणत सतेज पाटील यांनी सांगितले की, महायुतीत अनेकांचे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. त्यामुळे मी आता कोणावर टीका करणार नाही. उद्या कोण माझ्या स्टेजवर असेल सांगता येत नाही. त्यामुळे संजय मंडलिक पक्षाकडून उभे राहणार की अपक्ष उभे राहणार याबाबत मला काही कल्पना नाही. त्यावर मी आत्ताच भाष्यही करणार नाही.ठेकेदारांना काम हाच शक्तिपीठचा अजेंडाशक्तिपीठ महामार्ग करण्याची कोणाचीही मागणी नाही. धार्मिक नाव देऊन शेतकऱ्यांची शेतजमीन रस्त्यांसाठी घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न आहे. कंत्राटदारांना कामे देणे हाच शक्तिपीठ महामार्गाचा अजेंडा आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक