शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी मद्याची अवैध वाहतूक; साडेसोळा लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 19:58 IST

Excise Department LiquerBan Kolhapur-कागल तालुक्यातील गडहिंग्लज-कापशी रोडवर तमनाकवाडा बाळेघोल तिट्ट्‌यावर छापा टाकून एका स्कॉर्पिओ वाहनातून दुसऱ्या वाहनात बेकायदेशीर गोवा बनावट मद्याच्या बॉक्सची देवाण-घेवाण करताना सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख ३१ हजार किमतीचे विदेशी मद्य, मोबाईल, तसेच स्कॉर्पिओ वाहन असा सुमारे १६ लाख ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास केली.

ठळक मुद्दे राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाची कामगिरी जप्त कारवाईत चारचाकी वाहन, मोबाईलचा समावेश

कोल्हापूर : कागल तालुक्यातील गडहिंग्लज-कापशी रोडवर तमनाकवाडा बाळेघोल तिट्ट्‌यावर छापा टाकून एका स्कॉर्पिओ वाहनातून दुसऱ्या वाहनात बेकायदेशीर गोवा बनावट मद्याच्या बॉक्सची देवाण-घेवाण करताना सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख ३१ हजार किमतीचे विदेशी मद्य, मोबाईल, तसेच स्कॉर्पिओ वाहन असा सुमारे १६ लाख ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास केली.पथकाने दिलेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक संध्याराणी देशमुख, उपअधीक्षक बापूसाहेब चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकास, गडहिंग्लज - कापशी रोडवरून काहीजण बेकायदा गोवा बनावट मद्याची अवैधरित्या चोरटी वाहतूक करून मद्याची देवाण-घेवाण करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार या मार्गावर पथके पाळत ठेवून होती.

सोमवारी पहाटेच्या सुमारास गडहिंग्लज-कापशी रोडवर तमनाकवाडा बाळेघोल तिट्ट्यावर काहीं व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. पथकाने तेथे छापा टाकला., त्यावेळी एका स्कॉर्पिओ वाहनातून दुसऱ्या वाहनात गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स ठेवत असल्याचे आाढळले. तत्काळ पोलिसांनी तेथील सात जणांना अटक केली.या छाप्यात चारचाकी वाहनामधील गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रॅन्डच्या ७५० मि.लि. क्षमतेचे सुमारे ६ लाख ३१ हजार २०० रुपये किमतीचे १०३ बॉक्स, मोबाईल तसेच वाहन, असा सुमारे १६ लाख ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान सर्वश्री संदीप जानकर, मारुती पोवार, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक संभाजी बरगे करत आहेत.अटक केलेले मद्य तस्कर...अटक केलेल्या संशयितांमध्ये: निखिल ऊर्फ बल्या दत्ता रेडेकर (वय २९), स्वप्नील परसराम कांबळे (२३ ), राहुल गणपती कुंभार (२५, रा. बटकणंगले, मेन रोड, ता. गडहिंग्लज), अमोल आनंदा तिप्पे (३१, रा. तमनाकवाडा, तिप्पे गल्ली, ता. कागल), मंगेश अमरदास खाडे (३०, रा. मडिलगे बुद्रुक, ता. भुदरगड), अमर लक्ष्मण नाईक (३४, रा. कोळिंद्रे, ता. आजरा), बाळकृष्ण शंकर सुळेभावीकर (३२, रा. जांभुळवाडी, ता. गडहिंग्लज) यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागliquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूर