शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बेकायदेशीर पार्टीचे आयोजन, उजळाईवाडीतील कॅफेवर पोलिसांची कारवाई; चौघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 17:49 IST

मद्यसाठ्यासह एकूण २ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

उचगाव: उजळाईवाडी (ता. करवीर) येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गानजीक शाहु टोल नाक्याशेजारी असलेल्या एका कॅफेवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत मद्यसाठ्यासह एकूण २ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चोघांजणाविरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.कॅफेचे मालक दयानंद जयवंत साळोखे (रा. उजळाईवाडी), इव्हेंटकर्ते मयुरा रामचंद्र चुटाणी (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर), डी.जे ऑपरेटर नागेश लहू खरात (रा.फुलेवाडी), डी.जे मालक दिगंबर रघुनाथ सुतार (रा. फुलेवाडी), कामगार गजेंद्र रामदास शेठ (रा. बेकर गल्ली कोल्हापूर) व गौरव गणेश शेवडे (रा. न्यू शाहुपुरी कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ख्रिसमसच्या पूर्व संध्येला व नववर्षाच्या स्वागताला बेकायदेशीर पार्टीचे आयोजन करणाऱ्या विरुद्ध पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व पोलिस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या. या नुसार मिळालेल्या माहितीनुसार उजळाईवाडी येथे एका कॅफेवर बेकायदेशीर दारू पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथकासह आज पहाटेच्यासुमारास याठिकाणी छापा टाकला. यावेळी पार्टीत ६० ते ६५ पुरुष व ४० ते ४५ महिला होत्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलिस निरीक्षक सागर वाघ, सहा. फौजदार हरीश पाटील, खंडेराव कोळी, पो. हे कॉ. विलास किरोळकर, अमित सरजे, सचिन पाटील, संतोष पाटील, युवराज पाटील, प्रवीण पाटील, अमर अडूर्कर, सतीश पोवार, रणजित कांबळे, समीर कांबळे, सोम राज पाटील यांनी केली.नागरिकांमधून समाधान विविध पार्टीचे या ठिकाणी आयोजन करण्यात येते रातभर डी जेच्या आवाजाने आजू बाजूच्या रहिवाश्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी होत्या. पोलिसांनी छापा टाकल्याने रहिवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस