शिंगणापूर येथे ५१ हजाराचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:33+5:302021-03-24T04:23:33+5:30
कोपार्डे -- शिंगणापूर येथे करवीर करवीर पोलिसांनी कारवाई करत ५१ हजार रुपयाचा बेकायदेशीर देशी बनावटीच्या दारुचा साठा जप्त केला. ...

शिंगणापूर येथे ५१ हजाराचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त
कोपार्डे -- शिंगणापूर येथे करवीर करवीर पोलिसांनी कारवाई करत ५१ हजार रुपयाचा बेकायदेशीर देशी बनावटीच्या दारुचा साठा जप्त केला. यात रोहित अमर कांबळे व आनंदराव शंकर मस्कर (रा. शिंगणापूर) या आरोपीना पकडण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दुपारी सव्वा दोन दरम्यान ही कारवाई केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी शिंगणापूर येथे रोहित कांबळे व आनंदराव मस्कर हे बिगर परवाना बेकायदा देशी दारू विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आनंदराव मस्कर यांच्या पडक्या शेडमध्ये पोलिसांनी दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान छापा टाकला.यावेळी अमर कांबळे याच्याकडे देशी-विदेशी दारूचा ५० हजार ७५२ रुपयांचा बेकायदेशीर साठा सापडला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस हेड कॉस्टेबल सचिन देसाई पोलीस कॉस्टेबल किरण शिंदे व संजय चाचे यांनी केली.