शिवाजी पेठेत बेकायदेशीर मद्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:46 IST2021-02-21T04:46:49+5:302021-02-21T04:46:49+5:30

कोल्हापूर : गोवा बनावटीच्या बेकायदेशीर मद्याचा साठा जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. ही कारवाई शिवाजी पेठेतील मंगलदीप ...

Illegal liquor stocks seized in Shivaji Peth | शिवाजी पेठेत बेकायदेशीर मद्याचा साठा जप्त

शिवाजी पेठेत बेकायदेशीर मद्याचा साठा जप्त

कोल्हापूर : गोवा बनावटीच्या बेकायदेशीर मद्याचा साठा जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. ही कारवाई

शिवाजी पेठेतील मंगलदीप अपार्टमेंट येथे केली. पोलिसांनी ४६ हजारांचा मद्य साठा व दुचाकी असा सुमारे एक लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत दोघांना अटक केली.

अटक केलेल्या संशयितांची नावे अशी : अर्जुन राजेंद्र साळुंखे (२६, रा. मोहिते कॉलनी, तपोवन मैदान), फारुख दस्तगीर जमादार (३५, रा. सासने कॉलनी, मैलखड्डा, कोल्हापूर).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संभाजीनगर येथील इंदिरासागर चौकामध्ये पोलीस नाकाबंदी करून वाहने तपासणी करत होते, त्यावेळी अर्जुन साळुंखे हा रेसकोर्स नाक्याकडून मोपेडवरून येत होता. पुढे पोलिसांना पाहून तो पळून जात असताना त्याला पकडले. त्याच्या दुचाकीच्या डिकीत विदेशी दारूच्या दोन बाटल्या मिळाल्या. त्याच्याकडे चौकशी करता त्याने शिवाजी पेठेत एका घरात दारूचा साठा असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने शिवाजी पेठेतील आठ नंबर शाळेजवळील मंगलदीप अपार्टमेंटमध्ये तपासणी केली. त्यावेळी पूजा ट्रेडर्स असा फलक लावलेल्या घरात विनापरवाना गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांचा मद्यसाठा आढळला. पोलिसांनी तेथे फारुख जमादार याला ताब्यात घेतले. अटक केलेल्या दोघांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

फोटो नं. २००२२०२१-कोल-राजवाडा पोलीस स्टेशन

ओळ : शिवाजी पेठेत जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई करत गोवा बनावटीच्या मद्याचा साठा जप्त करून दोघांना अटक केली.

Web Title: Illegal liquor stocks seized in Shivaji Peth