शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

अवैध खैर वाहतूक करणारी टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST

पहाटे दोन वाजताची कारवाई ; एक लाखाचा मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : ...

पहाटे दोन वाजताची कारवाई ; एक लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

धामोड : धामोड - कोत - मानेवाडी मार्गावर एनारी (ता. वैभववाडी) येथील लाकूड व्यापाऱ्याला मध्यरात्री दोन वाजता म्हासुर्ली वनपाल व त्यांच्या पथकाने खैर लाकडाची अवैध वाहतूक करताना पकडले. मानेवाडी येथील एका वाहनचालकाला हाताशी धरून ही टोळी दुर्मीळ वनौषधींसह झाडांची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती वन विभागाला आठवडाभरापूर्वी मिळाली होती. त्यानुसार म्हासुर्ली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्री सापळा रचला. यावेळी केलेल्या कारवाईत दोन आरोपींसह १ लाख ३,३२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

केळोशी व म्हासुर्ली या संरक्षित वनांमधून दुर्मीळ वनौषधींसह काही वृक्षांची तोड होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. वैभववाडी तालुक्यातील एक टोळी स्थानिकांना पैशाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढत असल्याची गोपनीय माहिती सुत्रांकडून वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी मध्यरात्री २ वाजता वन विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.

या कारवाईत मानेवाडी (ता. राधानगरी) येथील लहू रामचंद्र माने याच्या गाडीत बिगरपासचे खैराचे लाकूड सापडले. या गाडीतील खैराच्या १.०० घनमीटर जळावू लाकूड मालासह वाहनही जप्त करण्यात आले. याप्रकरणी वाहनमालक लहू रामचंद्र माने (रा. कोतेपैकी मानेवाडी) व लाकूड व्यापारी रामचंद्र साईल (रा.एनारी, ता. वैभववाडी) यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ कलम ४१ (२) अन्वये प्रथम गुन्हा राशिवडे वनरक्षक उमा जाधव यांनी नोंदवला आहे. ही कारवाई आर. एस. तिवडे, दिनेश टिपुगडे, शिवाजी कांबळे, जोतिराम कवडे, संतोष करपे यांच्यासह उमा जाधव यांच्या पथकाने केली. पुढील तपास वनक्षेत्रपाल एस. बी. बिरासदर यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एस. तिवडे करत आहेत.

फोटो ओळी : मानेवाडी - धामोड (ता. राधानगरी) मार्गावर खैराची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालक व व्यापाऱ्यावर वनपाल आर. एस. तिवडे व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.