शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर छापा, ७३ घरगुती सिलिंडर जप्त

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 8, 2024 18:44 IST

दीड लाखांचा मुद्देमात जप्त, पुरवठा विभागाची कारवाई 

कोल्हापूर : शहरात तीन ठिकाणी सुरु असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर एकाच वेळी छापे टाकत पुरवठा विभागाने ७३ घरगुती गॅस सिलिंडर पाच रिफिलिंग मोटर्स, चार वजन काटे असे अंदाजे १ लाख ४५ हजारांचे साहित्य जप्त केले. हे स्टेशन चालविणाऱ्या तीनही मालकांवर आयपीसी कलम २८५, २८६ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम तीन व पाच अन्वये गुन्हा दाखल केला. जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न धान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील यांच्या पथकाने आज, शनिवारी सकाळी ही कारवाई केली. उद्यम नगरात महादेव खंडेराव शिंदे, रंकाळा स्टॅन्ड मागे साई बाबा मंदिराजवळ नारायण सुगंधराव कांबळे तसेच दसरा चौक परिसरातील मुस्लिम बोर्डिंग येथील तानाजी तुकाराम आरडे यांच्या अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर सकाळी छापा टाकण्यात आला. गणपती मंदिर व मुस्लिम बोर्डिंग अशा संवेदनशील ठिकाणांना लागूनच असलेल्या या सेंटरमुळे दुर्घटना घडल्यास मोठी जीवित वित्तहानी होण्याचा धोका होता.ग्राहक दक्षता फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या तक्रारीनंतर १५ मे रोजी मंगळवार पेठेतील गुलाब गल्ली येथे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षकांना शहरात अनेक ठिकाणी असे अवैध गॅस रिफिलिंग स्टेशन असल्याची माहिती मिळाली. कारवाईसाठी अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना अतिरिक्त कर्मचारी देण्याची विनंती केली.

चव्हाण यांनी तात्काळ दोन मंडळ अधिकारी, एक पुरवठा निरीक्षक दिले. तसेच संबंधित पोलीस ठाण्याला फोन करून गरज भासल्यास पोलीस बंदोबस्त पुरवण्याची सूचना दिली. ठरल्यानुसार शनिवारी ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनी अशा अवैध गॅस रिफिलिंग सेंटरची माहिती जवळच्या पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर