शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कोल्हापुरातील धामणी नदीपात्रात अवैधरित्या मासेमारी, मृत माशांचा खच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 17:05 IST

परिणामी, परिसरात गॅस्ट्रो सदृश्य साथ पसरून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महेश आठल्ये

म्हासुर्ली (कोल्हापूर): गेल्या चार दिवसापूर्वी अज्ञातानी धामणी नदीत अमानुष व अवैधरित्या केलेल्या मासेमारीमुळे अंबार्डे (ता.पन्हाळा) बंधाऱ्याच्या परिसरात हजारो मृत माशांचा खच पडला. यामुळे परिसरातील पाणी दूषित होऊन दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, परिसरात गॅस्ट्रो सदृश्य साथ पसरून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.धामणी नदीवर सद्या ठीक ठिकाणी मातीचे बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. आज आंबर्डे येथे काम सुरु असता नदी पात्रात मृत माशांचा खच दिसून आला. हे मासे पाण्याच्या प्रवाहाने गवशी - पाटीलवाडी (ता. राधानगरी) पासून आंबर्डे पर्यंत वाहत गेले आहेत. तीन-चार दिवसांपूर्वी नदीपात्रात अज्ञातांकडून जिलेटिन स्फोट, टीसीएल पावडरचा वापर, तसेच विद्युत प्रवाहाच्या साह्याने मासेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे हे मासे मृत्युमुखी पडले.या परिसरातील अनेक गावांची नळ पाणीपुरवठा जॅकवेल असून त्यातूनच गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. या दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण