सीपीआरसह आयजीएम, गडहिंग्लज कोविड रुग्णालये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 11:30 AM2021-04-09T11:30:18+5:302021-04-09T11:32:14+5:30

CoronaVirus Kolhapur-कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पूर्ण वेळ विलगीकरण रुग्णालय असणे अत्यंत आवश्यक असल्याने कोल्हापूरचे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, इचलकरंजीचे इंदिरा गांधी (आयजीएम) सामान्य रुग्णालय व गडहिंग्लजचे उपजिल्हा रुग्णालय पुढील दहा दिवसांनंतर कोविड रुग्णालये करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

IGM with CPR, Gadhinglaj Kovid Hospital District Collector's order: Implementation will take place in ten days | सीपीआरसह आयजीएम, गडहिंग्लज कोविड रुग्णालये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सीपीआरसह आयजीएम, गडहिंग्लज कोविड रुग्णालये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देसीपीआरसह आयजीएम, गडहिंग्लज कोविड रुग्णालये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दहा दिवसांनंतर होणार अंमलबजावणी

कोल्हापूर : कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पूर्ण वेळ विलगीकरण रुग्णालय असणे अत्यंत आवश्यक असल्याने कोल्हापूरचे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, इचलकरंजीचे इंदिरा गांधी (आयजीएम) सामान्य रुग्णालय व गडहिंग्लजचे उपजिल्हा रुग्णालय पुढील दहा दिवसांनंतर कोविड रुग्णालये करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

या रुग्णालयांसाठी कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवेसह या आदेशाच्या दिनाकांपासून १० दिवसांनी पुढील आदेशापर्यंत कोविडबाधित रुग्णांवरील उपचारासाठी पूर्ण वेळ विलगीकरण रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात येईल. तिन्ही रुग्णालयांतील इतर आजाराच्या रुग्णांना टप्प्या-टप्प्याने इतर खासगी रुग्णालये, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त खासगी रुग्णालये व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या धर्मादाय रुग्णालयांकडे संदर्भीत करून उपचाराची सोय करण्यात येईल. या रुग्णालयात पुढील आदेश होईपर्यंत कोरोना विषाणुसंशयित रुग्ण तपासणी व औषधौपचार वगळता इतर सर्व आजारांचे बाह्यरुग्ण उपचार सेवा आणि इतर आजारांच्या आंतररुग्णांना द्यावयाच्या वैद्यकीय सुविधा बंद राहतील.

या तीन रुग्णालयांतील पर्यायी उपचार व्यवस्था अशी...

सेवा रुग्णालय, कसबा बावडा, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी येथेच स्वतंत्र कक्षात व उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथेच स्वतंत्र कक्षात : बाह्य व आंतररुग्ण, इतर खासगी रुग्णालये, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त खासगी रुग्णालय व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या धर्मादाय रुग्णालयाकडे.
सर्पदंशावरील उपचार..
श्वानदंश, विंचूदंश, सर्पदंशावरील उपचाराकरिता लागणारी सर्व औषधे सीपीआर, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी व उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज यांनी रुग्ण उपचार घेत असलेल्या योजनेतील खासगी - धर्मादाय रुग्णालयास मागणीप्रमाणे उपलब्ध करून द्यायची आहेत.

न्यायवैद्यक प्रकरणातील उपचार...

या रुग्णालयातील न्यायवैद्यकीय प्रकरणातील रुग्णांच्या तपासणी व उपचार अनुक्रमे सेवा रुग्णालय कसबा बावडा, ग्रामीण रुग्णालय हातकणंगले व नेसरी येथे करण्याचे आहेत. यासाठी आवश्यकतेप्रमाणे तिन्ही शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्यात यावे. याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाने नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावयाची आहे.
शवविच्छेदन सुविधा...
सीपीआर, आयजीएम इचलकरंजी व उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे अपघात मृतदेहावरील न्याय वैद्यकीय पोस्टमार्टम सेवा, औषध विक्री सेवा व इतर लॅब्स नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

वैद्यकीय अधिकारी...

कोविड रुग्णालयास आवश्यक विशेषज्ञ व इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्यांचे अधिनस्त इतर रुग्णालयांमधून क्रमपाळीने उपलब्ध करून घ्यावेत. त्याचप्रमाणे खासगीरित्या तात्पुरत्या स्वरूपात अशा विशेषज्ञांची व वैद्यकीय अधिकारी यांची सेवा उपलब्ध करून घेण्यात यावी.
बैठक घ्या...
जिल्हा शल्यचिकित्सकांनी खासगी व धर्मादाय रुग्णालय व वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांची बैठक घेऊन नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Web Title: IGM with CPR, Gadhinglaj Kovid Hospital District Collector's order: Implementation will take place in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.