शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

'थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी, व्हाट्सअ‍ॅप स्टेटस पाहून पोलिसांकडून अटक सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 18:37 IST

Crimenews Police Kolhapur : तरुणांमध्ये सध्या व्हाटसअँप स्टेटसचं क्रेझ प्रचंड वाढलंय. मात्र त्यातून धक्कादायक प्रकार देखील सुरु झाले आहेत. शहरात स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारी आणि बंदूकीचे व्हिडीओ ठेवून सर्वसामान्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. इचलकरंजी शहरात अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसांनी मोहिमच सुरु केली आहे. जो तरुण अशाप्रकारे स्वत:ची क्रेझ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्याविरोधात थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारात पोलिसांनी दिला आहे.

ठळक मुद्दे'थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी, विरोधात गुन्हा दाखलव्हाट्सअ‍ॅप स्टेटस पाहून पोलिसांकडून अटक सत्र

इचलकरंजी : तरुणांमध्ये सध्या व्हाटसअँप स्टेटसचं क्रेझ प्रचंड वाढलंय. मात्र त्यातून धक्कादायक प्रकार देखील सुरु झाले आहेत. शहरात स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारी आणि बंदूकीचे व्हिडीओ ठेवून सर्वसामान्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. इचलकरंजी शहरात अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसांनी मोहिमच सुरु केली आहे. जो तरुण अशाप्रकारे स्वत:ची क्रेझ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्याविरोधात थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारात पोलिसांनी दिला आहे.विशेष म्हणजे अशा प्रकारे दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे.संबंधित कारवाई शिवाजीनगर आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केली आहे.कोल्हापूर नाका परिसरात राहणारा शरद इलाज तसेच आंबेडकर नगरमधील शाहरुख कामडुगी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शाहरुख कामडुगी या तरुणाने व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला भयानक व्हिडीओ शेअर केला होता. थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी, नाक्यावर फक्त आबांची टोळी, असे शब्द या व्हिडीओत होते. तसेच व्हिडीओत तलवार, पिस्तूल हे देखील होते. याशिवाय बदला घेण्याबाबतही व्हिडीओत भाष्य करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे संबंधित व्हिडीओ एकाकडून दुसऱ्याला असे अनेकांकडे फॉरवर्ड करण्यात आला. तसेत अनेकांनी असे व्हिडीओ व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवले. पोलिसांनी याबाबत माहिती मिळाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर