शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

पाणी देता येत नसले, तर राजीनामा द्या स्थायी समिती सभेत कोल्हापूर जलअभियंत्यांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 13:50 IST

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत उमटले. नागरिकांना नियमित पाणी देता येत नसेल, तर राजीनामा देऊन घरी जावे; पण शहरवासीयांचा अंत पाहू नका, अशा शब्दांत जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना भर सभेत खडसावण्यात आले.

ठळक मुद्देजर तुम्हाला जमत नसेल, तर राजीनामे देवून घरी जावे, अशा शब्दांत अजिंक्य चव्हाण यांनी कुलकर्णी यांना सुनावले.जोपर्यंत जल अभियंता सभेला येत नाहीत, तोपर्यंत कामकाज सुरू होणार नाही, असा आक्रमक पवित्रा

कोल्हापूर : शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत उमटले. नागरिकांना नियमित पाणी देता येत नसेल, तर राजीनामा देऊन घरी जावे; पण शहरवासीयांचा अंत पाहू नका, अशा शब्दांत जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना भर सभेत खडसावण्यात आले. सभेला उशिरा आल्याबद्दल कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सभापती आशिष ढवळे यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना दिले. विशेष म्हणजे महिला सदस्यांनी सभेत तीव्र नापसंती व्यक्त करत तातडीने पाणी पुरवठ्यात सुधारणा करावी, अशी जोरदार मागणी केली.

गेले काही महिने शहरातील पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले असून, नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. नागरिक नगरसेवकांच्या दारात जाऊन त्यांचा उद्धार करत आहेत. तसेच रास्ता रोकोसारखी आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभेत पडसाद उमटणे स्वाभाविक होते. त्यातच पाणी पुरवठा अधिकारी सभेला वेळेत आले नाहीत; त्यामुळे सदस्यांचा संताप आणखी वाढला. जोपर्यंत जल अभियंता सभेला येत नाहीत, तोपर्यंत कामकाज सुरू होणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जल अभियंता कुलकर्णी यांना बोलावून घेतले.

कुलकर्णी सभागृहात येताच त्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडत त्यांना फैलावर घेतले. मागील अनेक सभेत चर्चा होऊनदेखील पाणी पुरवठ्याचे नियोजन केलेले नाही. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही, अशा शब्दांत सभापती ढवळे यांनी नापसंती व्यक्त केली. पाणी मिळणार आहे की नाही, हे प्रशासनाने एकदा सांगावे, अशा शब्दांत संजय मोहिते यांनी कुलकर्णी यांना झापले. रोज महिला आमच्या दारात येत आहेत. मागील नगरसेवक असताना आम्हाला पाण्याचा त्रास झाला नाही; परंतु तुम्ही आल्यापासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा शब्दांत नागरिक आमची कान उघाडणी करत आहेत.

जर तुम्हाला जमत नसेल, तर राजीनामे देवून घरी जावे, अशा शब्दांत अजिंक्य चव्हाण यांनी कुलकर्णी यांना सुनावले. पाण्याचा खजिना येथील कर्मचारी उद्धट उत्तरे देतात. मदन यादव हा कर्मचारी अशाच पद्धतीने नगरसेवकांशी बोलतो त्याची ताबडतोब बदली करा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. शेवटी सभागृहात पाणी पुरवठ्यासंबंधी समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने अधिकाºयांच्या निषेधार्थ ही सभा तहकूब करण्यात आली.एक दिवस आडचा पर्यायपाणी पुरवठा नियोजनात ५ ते ६ महिने बदल करून पाहिले आहे. पाणी पुरवठ्याची क्षमता व नवीन वाढलेली कनेक्शन याचा ताळमेळ बसत नाही; त्यामुळे एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा आमचा विचार आहे. तसा प्रस्ताव तयार करून आयुक्तांच्या मान्यतेला सादर करू, असे जल अभियंता कुलकर्णी यांनी सांगितले.

ए व बी वॉर्डला पाणी सोडण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे दोन दिवस पाणी पुरवठा व्यवस्थितझाला नाही. पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी चार कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असा खुलासाही कुलकर्णी यांनी यावेळी केला.

टॅग्स :water transportजलवाहतूकkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका