शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

माफी मागितली नाही तर पडळकरांना कोल्हापुरी हिसका दाखवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 11:30 IST

कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी तातडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माफी मागावी, अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसने पत्रकातून दिला.

ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉग्रेसचा कोल्हापुरी इशारा पोकळ बडबड करण्यापेक्षा शरद पवार यांच्या योगदानाचे भान ठेवावे

कोल्हापूर : कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी तातडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माफी मागावी, अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसने पत्रकातून दिला.शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, अशी टीका बुधवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उटले आहेत. कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रक काढून याचा निषेध केला.

पडळकर यांनी वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलंकच आहे. पडळकरांचे वय आहे, त्याच्या दुप्पट वर्षे शरद पवार यांनी राजकारण, समाजकारण आणि बहुजनांच्या कल्याणार्थ आयुष्य खर्च केले. त्यांनी आपले वय, सामाजिक कर्तृत्व आणि समाजकारण-राजकारणातील आपले योगदान किती, याचेही भान ठेवायला हवे होते.

शरद पवार यांनी उभी हयात महाराष्ट्राच्या आणि विशेषत: बहुजन समाजाच्या विकासासाठी खर्च केल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, नविद मुश्रीफ, अनिल साळोखे यांनी पत्रकातून दिली.पडळकर हे धनगर समाजाला लागलेला शापपडळकर यांनी आमदारकीसाठी समस्त धनगर समाजाशी प्रतारणा केली. त्यांनी समाजाला वाऱ्यावर सोडून विश्वासघात केला असून, ते म्हणजे समस्त धनगर समाजाला लागलेला शापच असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर