शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

..तर भविष्यात सत्ता स्थापणे अवघड, अजित पवारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 16:18 IST

शिंदे-फडणवीस सरकार जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे सरकार आहे. जातिभेदाचा विचार पुढे घेऊन जाणारे सरकार फार काळ टिकणार नाही.

सरदार चौगुलेकोल्हापूर : आमदार फुटून जर सरकार कोसळायला लागले तर भविष्यात सत्ता स्थापन करणे अवघड आहे. ज्या गद्दारांमुळे आघाडी सरकार पडले, त्या आमदारांसह कोल्हापुरातील गद्दारांनासुद्धा येत्या निवडणुकीत जागा दाखवू. आता मॅच फिक्सिंग न करता एकाच विचारधारेने आणि समजुतीचे राजकारण करूया. त्याची प्रचिती दसऱ्या मेळाव्यात सर्वांना अनुभवायला मिळाली. कोणाचे भाषण सुरू असताना लोक निघून गेले, पैसे देऊन कोणी लोक जमवले आणि पदरमोड करून कोण शिवतीर्थावर आले याकडे राज्यांतील जनतेचे चांगले लक्ष आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील ग्रामपंचायत सचिवालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ होते. मेळाव्याचे आयोजन बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी केले.पवार म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. तो कधी होणार हे माहीत नाही; पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच राज्याचा कारभार हाताळत आहेत. सहा जिल्ह्याचे पालमंत्र्यांची जबाबदारी एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.महाआघाडीचे सरकार असताना निधी वाटपात, विकासकामात कधीही भेदभाव केला नाही. आघाडी सरकारच्या काळात आम्ही आमदार निधी एक कोटीवरून पाच कोटी केला; मात्र हे सरकार निधी वाटपात भेदभाव करत आहे. बरोबरीने राहू दे, विरोधी आमदारांना निम्म्याने तरी विकास निधी द्या. शिंदे-फडणवीस सरकार जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे सरकार आहे. जातिभेदाचा विचार पुढे घेऊन जाणारे सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढविण्यासाठी प्रयत्न करूया.यावेळी माजी मंत्री मुश्रीफ यांचेही भाषण झाले. आमदार राजेश पाटील, शिवसेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील, संध्यादेवी कुपेकर, राजू आवळे, जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, मानसिंगराव कुपेकर, संतोष धुमाळ उपस्थित होते.

हे असे म्हणाले.. ते असे म्हणाले..

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला पाहिजे होते. ते सोडून हे असे म्हणाले आणि ते असे म्हणाले यातच त्यांनी सव्वा तास घेतला, अशी टोला पवार यांनी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवार