शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर ज्वोल्ले यांनी स्वत: आरोप करावेत

By admin | Updated: February 19, 2015 00:30 IST

काकासाहेब पाटील यांचे आव्हान

निपाणी : आपल्या कारकिर्दीत निपाणी मतदारसंघात अनेक विकासकामे राबवलीत; पण गेल्या १३ वर्षांत या मतदारसंघाचा विकास खुंटला होता हा आमदार शशिकला ज्वोल्ले यांचा आरोप चुकीचा आहे. आ. ज्वोल्ले यांनी हिंमत असेल तर कार्यकर्त्यांचा बळी न देता स्वत: आरोप करावेत, असे आव्हान माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले.ते म्हणाले, माझे विधान नैराश्येतून नाही. १९७७ मध्ये माजी खासदार बी. शंकरानंद, माजी आमदार रघुनाथराव कदम यांच्याबरोबर कॉँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम केले. १९८७ मध्ये कणगला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो. त्यापूर्वी जिल्हा बॅँकेत संचालक, टोबॅको फेडरेशन, मार्केट कमिटी येथे पदाधकारी होतो.माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा व धरमसिंग, लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री मोइली, माजी मंत्री मुनीअप्पा, अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे सरचिटणीस आॅस्कर फर्नांडिस, बी. के. हरिप्रसाद, मुख्यमंत्री सिद्धरामय्या व प्रदेशाध्यक्ष डॉ. परमेश्वर या सर्वांना माझे कार्य माहिती आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे माझी सर्व कामे मी आमदार असल्याप्रमाणे मार्गस्थ लावतात. त्यामुळे नैराश्य येण्याचे कारणच नाही.माझ्याबद्दल विधान व आरोप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी २०१८ मध्ये आमदार ज्वोल्ले यांना जरूर मदत करावी; मात्र बळीचा बकरा होऊ नये, असे आवाहन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले आहे.यावेळी खादी ग्रामोद्योग अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, गोपाळ नाईक, प्रदीप जाधव, सुकुमार पाटील, पंकज पाटील, राजेश कदम, कबीर वराळे, सीताराम मोहिते, लतिका सासणे, आदी उपस्थित होते.————————फोटो १८ एनपीएन ३माजी आमदार काकासाहेब पाटील.