कळंब्यात यंदाही मूर्ती, निर्माल्यदान उपक्रम
By Admin | Updated: September 4, 2014 00:05 IST2014-09-04T00:04:02+5:302014-09-04T00:05:22+5:30
तलाव प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न : कळंबा ग्रामपंचायत, युवा मंडळे एकवटली

कळंब्यात यंदाही मूर्ती, निर्माल्यदान उपक्रम
कळंबा : उपनगरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत असणारा कळंबा तलाव प्रदूषणमुक्ती यंदाही कळंबा ग्रामपंचायत, ग्रामस्थ व युवा मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशमूर्ती व निर्माल्यदान उपक्रम राबविण्यात येणार आहे.
गेली चार वर्षे हा उपक्रम राबविला जात असून, प्रतिवर्षी नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे.
यंदा कळंबा तलावाच्या पूर्वेस पाचगाव व शांतीनगर परिसरासाठी कृत्रिम कुंड, तर पश्चिमेस उपनगरवासीयांसाठी कुंड व सहा काहिलींची मूर्र्तिदान करण्यासाठी सोय केली आहे. तर निर्माल्यदान करण्यासाठी पालिकेचे दोन डंपर, ग्राम पंचायतीचे दोन ट्रॅक्टर, आदी वाहने उपलब्ध करून दिली आहेत.
तलाव प्रदूषित झाल्यास पर्यावरणास धोका असून, नागरिकांनी मूर्ती व निर्माल्यदान करावे, असे आवाहन सरपंच विश्वास गुरव, उपसरपंच उदय जाधव, नगरसेवक मधुकर रामाणे यांनी केले आहे. (वार्ताहर)