शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ऑनलाईन शाळा ॲप राज्यभर वापरण्याचा विचार - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 7:18 PM

अहमदनगर येथील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, मयूरेश पाटील यांनी तयार केलेले व कागल तालुक्यात कार्यान्वित असलेले ऑनलाईन शाळा हे ॲप संपूर्ण राज्यात लागू करण्याचा विचार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ठळक मुद्देऑनलाईन शाळा ॲप राज्यभर वापरण्याचा विचार - हसन मुश्रीफ मंत्रालयातील बैठकीत घेतला आढावा : आराखडा तयार करण्याच्या सूचना

कोल्हापूर : अहमदनगर येथील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, मयूरेश पाटील यांनी तयार केलेले व कागल तालुक्यात कार्यान्वित असलेले ऑनलाईन शाळा हे ॲप संपूर्ण राज्यात लागू करण्याचा विचार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यांत ते पायलट प्रोजेक्ट म्हणून वापरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ऑनलाईन ॲपबाबत मंत्री मुश्रीफ यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. यामध्ये ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव अरविंदकुमार, कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, मयूरेश पाटील, महादेव गुरव, रमेश कदम, रवींद्र पाटील, आदी उपस्थित होते.कोरोना महामारी संपल्यानंतरसुद्धा हे ॲप कायमस्वरूपी कसे उपयोगी पडेल, उजळणी कशी घेता येईल व इतर आनुषंगिक बाबींची सविस्तर माहिती या बैठकीत देण्यात आली. कोल्हापूर व अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन ॲप कार्यान्वित करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcorona virusकोरोना वायरस बातम्याHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर