‘यंत्रमाग’ कर्नाटकात हलविण्याचा विचार

By Admin | Updated: February 23, 2015 00:31 IST2015-02-23T00:31:46+5:302015-02-23T00:31:59+5:30

इचलकरंजीत आज बैठक : वीज दरवाढीला उद्योजकांचा विरोध

The idea of ​​moving the 'powerloom' to Karnataka | ‘यंत्रमाग’ कर्नाटकात हलविण्याचा विचार

‘यंत्रमाग’ कर्नाटकात हलविण्याचा विचार

इचलकरंजी : औद्योगिक वीजदराचे वाढत जाणारे संकट आणि त्याबाबत उद्योजकांनी वारंवार मागणी करूनही शासनाकडून केले जाणारे दुर्लक्ष यामुळे यंत्रमाग कारखाने कर्नाटक राज्यात हलविण्याचा विचार येथील उद्योजक करीत आहेत. त्यासाठी आज, सोमवारी शहर व परिसरातील यंत्रमागधारक व अन्य उद्योजकांची बैठक समाजवादी प्रबोधिनीमध्ये आयोजित केली आहे.
शहरातील यंत्रमाग क्षेत्रात कार्यरत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तीमध्ये वरील निर्णय घेण्यात आला. तसेच वीज दरवाढी विरोधी शुक्रवारी (दि. २७) वीज बिलांची होळी करण्याचेही बैठकीत ठरविले. बैठकीसाठी यंत्रमागधारक व यंत्रमागशी संलग्न उद्योगांचे सतीश कोष्टी, विश्वनाथ मेटे, गोरखनाथ सावंत, दीपक राशिनकर, बंडोपंत लाड, सुरेश पाटील, अजित जाधव, सागर चाळके, राहुल निमणकर, आदी प्रतिनिधी उपस्थित होते. आजच्या बैठकीसाठी ‘गोशिमा’चे अध्यक्ष अजित आजारी, माजी अध्यक्ष उदय दुधाणे, वीज संघटनांच्या समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The idea of ​​moving the 'powerloom' to Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.