शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

Kolhapur News: निवारा ट्रस्टने दिल्या आयडीबीआय बँकेच्या खोट्या पावत्या, बँकेकडून मात्र फारशी दखल नाही

By विश्वास पाटील | Updated: May 5, 2023 12:43 IST

बँकेचा रीतसर लोगो वापरला

विश्वास पाटील कोल्हापूर : बँकेत खाते नाही, पैसेही थेट बँकेला दिलेले नाहीत. तरीही लोकांना ‘निवारा टेस्टामेंटरी ट्रस्ट अँड एनजीओ’ने चक्क आयडीबीआय बँकेच्या पुण्यातील लोकमान्यनगर शाखेच्या धडधडीत खोट्या पावत्या दिल्या आहेत. या पावत्यांची मुदत एप्रिलमध्ये संपल्यावर लोकांनी बँकेत जाऊन चौकशी केल्यावर पावत्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले; परंतु, एखादा ट्रस्ट बँकेच्या नावाचा असा गैरवापर करून लोकांची फसवणूक करत असताना आयडीबीआय बँकेनेही त्याची फारशी दखल घेतलेली नाही, याचेच आश्चर्य आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आयडीबीआय बँकेच्या लोकमान्यनगर शाखेशी संपर्क साधला; परंतु, फोन कुणी उचलला नाही.ज्यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात या ट्रस्टच्याविरोधात तक्रार दिली त्या सचिन देसाई यांनी ३,९०० रुपये ट्रस्टकडे जमा केल्यावर त्यांना ट्रस्टने आयडीबीआय बँकेची ठेवपावती दिली आहे. प्रत्यक्षात ती ठेवपावती नाहीच. सुविधा रक्कम जमा झाल्याची पावती, असे त्यात म्हटले आहे. म्हणजे या पावतीचा खोटेपणा तिथूनच सुरू होतो. प्रत्यक्षात ती पावती कुणालाही खरी वाटावी, अशीच आहे. त्यात बँकेचा रीतसर लोगो वापरला आहे. बँकेचा पत्ताही आहे. फोन नंबरही वापरला आहे; परंतु, तो सध्या बंद आहे. त्यातील पावतीचा नंबर ०९२४७५१ असा आहे. १८ ऑक्टोबर २०२१ ला त्यांना ही ठेवपावती दिली आहे. तिची मुदत १८ महिन्यांची होती. ती १८ एप्रिल २०२३ ला संपली. त्याचा वार्षिक व्याज दर ७.१५ टक्के आहे. जमा रक्कम पाच कोटी ३५ लाख ७५ हजार रुपये असून मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम मात्र पाच कोटी ९३ लाख २० हजार ९२८ इतकी आहे. एवढी रक्कम ट्रस्टकडे जमा असल्याचे त्यातून भासवले आहे. त्या पावतीच्या मागे श्रृती ठाकरे रिलेशनशीप मॅनेजर (ईआयएन१०७६७१- ३० जुलै २०२२) असे नाव असून त्यावर पेनाने सही केली आहे. ठेवपावती आपल्या नावे असल्याने देसाई यांनी आयडीबीआय शाखेच्या शाहुपुरी, राजारामपुरी आणि महाद्वार शाखेत जाऊन चौकशी केली. सातारा मुख्य कार्यालयातही ते जाऊन आले. पुण्यातील संबंधित शाखेतही ते गेले. बँकेतील अधिकाऱ्यांनी त्यांना याच्याशी बँकेचा काडीमात्र संंबंध नाही. तुम्ही बँकेत आलेला नाही. ठेव ठेवलेली नाही आणि बँक तुम्हाला कुठले पैसे देणार, अशी विचारणा करून बाहेर काढले; परंतु, बँकेच्या नावावर असा व्यवहार कोण करते, याची चौकशी मात्र त्यांनी स्वत:हून करायला हवी होती. तसे घडलेले नाही.

ठेवपावत्या करताना मखलाशी...

या लोकांना ज्या ठेवपावत्या दिल्या आहेत, त्या करतानाही ट्रस्टने मखलाशी केली आहे. नोटरी करण्यासाठी म्हणून लोकांना बोलवले. त्यांना दिलेल्या ठेवपावत्या आपल्याकडे काढून घेतल्या. नोटरी झाल्यावर त्या लगेच परत करतो, असे सांगितले. नोटरी करताना मात्र सह्या करण्यासाठी पूजा भोसले आल्याच नाहीत. त्यामुळे त्यांच्या सह्या झाल्यावर ठेवपावत्या परत देतो, असे सांगून त्या पावत्या ट्रस्टने आपल्याकडे ठेवल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीbankबँकfraudधोकेबाजी