इचलकरंजीत ६८ पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:32+5:302021-05-08T04:25:32+5:30

इचलकरंजी : येथील विविध ४१ भागांतील ६८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सिद्धार्थ हौसिंग ...

Ichalkaranjit 68 positive; Death of four | इचलकरंजीत ६८ पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू

इचलकरंजीत ६८ पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू

इचलकरंजी : येथील विविध ४१ भागांतील ६८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सिद्धार्थ हौसिंग सोसायटीजवळील ६१ वर्षीय, सावली सोसायटी ६८ वर्षीय वृद्ध, लायकर टॉकीजजवळील ५५ वर्षीय महिला व कापड मार्केटमधील ७३ वर्षीय वृद्धेचा समावेश आहे.

जवाहरनगर ८, विक्रमनगर ६, गणेशनगर ५, कारंडे मळा ४, कोल्हापूर रोड, मारुती मंदिरजवळ, ऋतुराज कॉलनी येथील प्रत्येकी ३, गावभाग, कृष्णानगर येथील प्रत्येकी २, सुतार मळा, भोनेमाळ, सोलगे मळा, इंदिरा हौसिंग सोसायटी, प्रियदर्शनी कॉलनी, वेताळ पेठ, लायकर टॉकीजजवळ, दत्तनगर, योगायोगनगर, पुजारी मळा, सम्राट अशोकनगर, खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेटजवळ, आयजीएम क्वाॅर्टर्सजवळ, ढवळे हॉस्पिटलजवळ, राजाराम स्टेडियमजवळ, भोईनगर, साई समर्थनगर, संग्राम चौक, सांगली नाका, जामदार गल्ली, बावणे गल्ली, वर्धमान हौसिंग सोसायटी, महेशनगर, कामगार चाळ, यड्राव फाटा, तुळजाभवानी अपार्टमेंट, रिंग रोड, नदीवेस, बिरदेव मंदिरजवळ, शहापूर, सावली सोसायटी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत पाच हजार ५१४ जणांना लागण झाली असून, चार हजार ६७२ जण बरे झाले आहेत. ५९५ जण उपचार घेत असून, मृत्यू संख्या २४७ वर पोहोचली आहे.

Web Title: Ichalkaranjit 68 positive; Death of four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.