इचलकरंजीच्या मोबाईल चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:06+5:302021-06-17T04:17:06+5:30

१२ जून २०२१ रोजी महंमदअली मुल्लाणी (रा. धरणगुत्ती) हे जयसिंगपूर-नांदणी मार्गावरून किराणा साहित्य आणण्यासाठी जात होते. याचवेळी संशयित भोळे ...

Ichalkaranji's mobile thieves arrested | इचलकरंजीच्या मोबाईल चोरट्यांना अटक

इचलकरंजीच्या मोबाईल चोरट्यांना अटक

१२ जून २०२१ रोजी महंमदअली मुल्लाणी (रा. धरणगुत्ती) हे जयसिंगपूर-नांदणी मार्गावरून किराणा साहित्य आणण्यासाठी जात होते. याचवेळी संशयित भोळे व भोपळे यांनी मोटारसायकलीवरून पाठीमागून आले. त्यांनी मारण्याची धमकी देऊन मुल्लाणी यांच्याकडील मोबाईल संच काढून घेऊन पळून गेले. याबाबतची तक्रार मुल्लाणी यांनी शिरोळ पोलिसांत दिली होती. दरम्यान, गुन्हे शोध पथकाकडून तेथील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन तपास करण्यात आला असता, संशयितांना शोधण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सूळ, कॉन्स्टेबल हनुमंत माळी, ताहीर मुल्ला, युवराज खरात, गजानन कोष्टी, अभिजित परब यांच्या पथकाने केली.

फोटो - १६०६२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - शिरोळ पोलिसांनी इचलकरंजीच्या मोबाईल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Ichalkaranji's mobile thieves arrested