शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत मोर्चेबांधणीस वेग

By admin | Updated: December 19, 2014 23:33 IST

उत्सुकता शिगेला : पक्षश्रेष्ठींना साकडे

इचलकरंजी : नगरपालिकेकडील विविध विषय समित्यांची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर असल्याने पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम या दोन समित्यांकडील सभापतिपदी वर्णी लागण्याबद्दल मोठी उत्सुकता आहे. पालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रीय कॉँग्रेसकडे पाणीपुरवठा, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे सार्वजनिक बांधकाम समिती असल्याने दोन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींकडे इच्छुक नगरसेवकांनी साकडे घातले आहे.नगरपालिकेमध्ये पक्षीय बलाबलप्रमाणे राष्ट्रीय कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक आहेत. त्यापैकी राष्ट्रीय कॉँग्रेसकडे पाणीपुरवठा, आरोग्य आणि महिला व बालकल्याण या तीन समित्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सार्वजनिक बांधकाम व शिक्षण अशा दोन समित्या वाट्याला आल्या आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे जांभळे गटाचे वर्चस्व आहे. परिणामी भाऊसाहेब आवळे व लतीफ गैबान यांनी बांधकाम समितीचे सभापतिपद मागितले असले तरी त्याबाबतचा निर्णय रविवारी (२१ डिसेंबर) राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या होणाऱ्या नगरसेवकांच्या बैठकीत होईल, अशी माहिती माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी दिली.राष्ट्रीय कॉँग्रेसमधील दिलीप झोळ व रवी रजपुते या दोघांचीही इच्छा पाणीपुरवठा समितीचे सभापतिपद मिळावे, अशी आहे. दोघेही तोलामोलाचे नगरसेवक असल्याने दोघांपैकी एकाची निवड करण्याची कसोटी पक्षश्रेष्ठींसमोर आहे. मात्र, दोघांनाही एकत्रित बसवून पहिल्यांदा सभापतिपद कोणाला हवे, याचा निर्णय त्यांनी करावा, असा तोडगा पक्षश्रेष्ठींकडून सुचविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय आरोग्य समितीसाठी मिना बेडगे, भक्ती बोंगार्डे आणि सुजाता बोंगाळे यांच्यात चुरस असली तरी जास्तीत जास्त वेळ देणाऱ्या नगरसेविका म्हणून बेडगे यांचे नाव पुढे येत आहे. याशिवाय दरवर्षीप्रमाणेच शिक्षण आणि महिला व बालकल्याण या समित्या काहीशा दुय्यम दर्जाच्या मानण्यात येत असल्याने या समित्यांच्या सभापतिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याचीही उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)