कळंबा कारागृहात मोबाईल फेकल्याप्रकरणी इचलकरंजीतील युवकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:22 IST2021-02-08T04:22:17+5:302021-02-08T04:22:17+5:30
दि. २२ डिसेंबरला मध्यरात्री कळंबा कारागृहात सुरक्षा भिंतीवरून १० मोबाईल, चार्जर, बाटऱ्या, गांजा अशा साहित्याचे तीन गठ्ठे कैद्यांना ...

कळंबा कारागृहात मोबाईल फेकल्याप्रकरणी इचलकरंजीतील युवकास अटक
दि. २२ डिसेंबरला मध्यरात्री कळंबा कारागृहात सुरक्षा भिंतीवरून १० मोबाईल, चार्जर, बाटऱ्या, गांजा अशा साहित्याचे तीन गठ्ठे कैद्यांना पुरवण्याच्या उद्देशाने आत फेकले होते. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी शिताफीने तपास करत शुभम सोपान ऐवळे (वय २३, रा. शहापूर, इचलकरंजी), पैलवान हृषिकेश सदाशिव पाटील (रा. कोदवडे, ता. राधानगरी), राजेंद्र ऊर्फ दाद्या धुमाळ (रा. रेल्वे स्टेशननजीक, जयसिंगपूर) यांच्यासह कारागृहातील न्यायालयीन बंदी ओंकार ऊर्फ मुरली दशरथ गेंजगे (वय २२, रा. शहापूर, इचलकरंजी) या संशयितांना अटक केली होती.
दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा शकील झाकीर गवंडी याला अटक केली. त्याला रविवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी अद्याप भीष्म्या ऊर्फ भीम्या चव्हाण (रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), जयपाल वाघमोडे (रा. वडिये, ता. कडेगाव, जि. सांगली, सध्या रा. गंगावेश, कोल्हापूर) हे संशयित फरारी आहेत.
फोटो नं. ०७०२२०२१-कोल-शकील गवंडी (आरोपी)