शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

इचलकरंजीत यंत्रमाग उद्योग राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:24 AM

CoronaVirus Ichlkarnji Industry Kolhapur: शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करून यंत्रमाग व्यवसाय सुरू ठेवणे अशक्य आहे. तसेच यंत्रमागासाठी आवश्यक असणारे अन्य पूरक व्यवसाय बंद राहणार असल्याने काही मोजके ऑटोलूमधारक वगळता संपूर्ण वस्त्रोद्योग बंद राहील.

ठळक मुद्देइचलकरंजीत यंत्रमाग उद्योग राहणार बंदचालू ठेवण्यासाठीचे नियम पाळणे अशक्य

अतुल आंबी

इचलकरंजी : शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करून यंत्रमाग व्यवसाय सुरू ठेवणे अशक्य आहे. तसेच यंत्रमागासाठी आवश्यक असणारे अन्य पूरक व्यवसाय बंद राहणार असल्याने काही मोजके ऑटोलूमधारक वगळता संपूर्ण वस्त्रोद्योग बंद राहील. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे.

या प्रश्नी पालकमंत्री सतेज पाटील यांची यंत्रमाग, प्रोसेसर्स, सायझिंगधारकांनी भेट घेतली. परंतु, त्यांनी नियम सोडून चालू ठेवण्यास परवानगी मिळणार नसल्याने सहकार्य करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रात कोरोनाची दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्णसंख्या पाहता, सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामध्ये उत्पादन करणारे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली असली, तरी त्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये कामगारांना १५ दिवस कामाच्या ठिकाणी थांबवून ठेवणे, त्यांची सर्व सोय करणे, कामगारांना कोरोना लस देणे, असे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. शहरातील गल्लोगल्ली विस्तारलेला वस्त्रोद्योग पाहता, या नियमांचे पालन अशक्य आहे.

त्याचबरोबर यंत्रमाग व्यवसायासाठी लागणारे अन्य पूरक व्यवसाय बंद राहणार असल्याने पंधरा दिवसांचा कच्चा माल, स्पेअर पार्ट, अन्य साहित्य याचा साठा ठेवणे सर्वसामान्य व्यावसायिकांना शक्य नाही. सूतपेढ्या, कापड पेढ्या बंद असल्याने सूत मिळणे व उत्पादित झालेले कापड पाठवणे शक्य होणार नाही. या सर्वांचा विचार केल्यास वस्त्रोद्योग बंदच राहणार आहे. दरम्यान, शहरातील काही मोजक्या ऑटोलूमधारकांकडे कामगारांसाठी राहण्याची व्यवस्था आहे, तेथे कच्चा माल, स्पेअरपार्ट उपलब्ध असेपर्यंत उद्योग सुरु ठेवले जातील. परंतु, उत्पादित माल त्यांनाही साठवणूक करूनच ठेवावा लागणार आहे.

परवानगी तरीही...

लग्न करायला परवानगी दिली असली, तरी मुंडावळ्या, लग्नाचा जथ्था, पूजेसाठी लागणारे साहित्य काहीच मिळणार नाही. त्यामुळे लग्नाला परवानगी असली तरी लग्न होणार नाही, अशा स्वरुपाची परिस्थिती उद्योजकांची आहे. उद्योग सुरू ठेवायला परवानगी असली तरी अन्य साहित्य मिळणार नाही व नियम पाळणे शक्य नाही. त्यामुळे उद्योग बंदच राहणार.

शहरातील उद्योग व उत्पादन याप्रमाणे

शहरात सुमारे ८० हजार साधे लूम, ३० हजार ऑटोलूम, ७५ प्रोसेसर्स, सायझिंग २५० असे व्यवसाय असून, दररोज साधारण दीड कोटी मीटर कापडाचे उत्पादन केले जाते. ते जवळपास ठप्प राहणार आहे तसेच यावर अवलंबून असणारे यंत्रमाग कामगार, जॉबर, कांडीवाला, मेंडींग असे साधारण एक लाख कामगार आहेत. त्यांचेही काम ठप्प राहणार आहे.

शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये कुचराई आढळल्यास प्रशासनाकडून कारवाई केली जाईल. आपत्कालिन परिस्थितीत सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.- डॉ. विकास खरात, प्रांताधिकारी

शासनाचे नियम व अटींचे पालन करणे ज्यांना शक्य आहे, ते यंत्रमाग सुरू ठेवू शकतात. परंतु, नियमबाह्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. याबाबत पॉवरलूम असोसिएशनने पालकमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, व्यवसाय बंद ठेवणे सोयीस्कर ठरेल.

- सतीश कोष्टी,अध्यक्ष, पॉवरलूम असोसिएशन.

यंत्रमाग बंद व वाहतूक सुरू अशी परिस्थिती झाल्यास परराज्यातील व परगावातील कामगार आपापल्या गावी परत जातील. त्यामुळे वस्त्रोद्योगाची घडी पुन्हा विस्कटण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्येही या उद्योगाचे मोठे नुकसान झाले होते.

- विनय महाजन,अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना

टॅग्स :businessव्यवसायkolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजी