शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
5
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
6
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
7
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
8
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
9
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
10
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
11
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
12
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
13
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
14
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
15
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
16
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
17
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
18
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
19
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
20
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...

कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून शीतयुद्ध इचलकरंजी नगरपालिका : लोकप्रतिनिधी-प्रशासनात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 23:53 IST

येथील नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून शहरातील स्वच्छता करून घ्यावी, असा आग्रह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी धरला आहे.

ठळक मुद्दे आरोग्य विभागात सेवा-कामकाज वाद

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून शहरातील स्वच्छता करून घ्यावी, असा आग्रह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी धरला आहे. मात्र, अन्य विभागाकडे सेवा देणाºया कामगारांनी पुन्हा आरोग्य विभागाच्या सेवेत यावे, असे आदेश मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी दिले आहेत. परिणामी लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असे शीतयुद्ध नगरपालिकेत सुरू झाल्याची चर्चा आहे.

येथील नगरपालिकेकडील आरोग्य विभागाकडे ७४२ कर्मचारी आहेत. त्यापैकी १३५ कर्मचारी अन्य खात्यांमध्ये वेगवेगळ्या सेवा देत आहेत, तर ६०७ कर्मचारी सध्या आरोग्य विभागाकडे कार्यरत आहेत. पालिकेमध्ये साफसफाई करण्यासाठी ३९० हद्दी असून, त्यांना ३९० कर्मचाºयांची आवश्यकता आहे. रजा, सुट्या, आदी कारणांसाठी वीस टक्के कर्मचारी अधिक लागतात. हे गृहीत धरून ४६८ कर्मचारी आरोग्य विभागाकडे नियमितपणे पाहिजे आहेत. यापैकी एका वॉर्डामध्ये खासगी ठेक्यामार्फत साफसफाई केली जाते.

तसेच मलेरिया प्रतिबंधक औषध फवारणीसाठी २६ वॉर्डांमध्ये २६ कर्मचारी, सारण गटारींसाठी ५० कर्मचारी अशा ७६ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सार्वजनिक शौचालये साफसफाईसाठी ५४ कर्मचाºयांची गरज आहे. असे सर्व मिळून ५६७ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यापैकी गैरहजर राहणाºया कर्मचाऱ्यांचे प्रमाण सुमारे १३ कर्मचारी गृहीत धरले, तर कायमस्वरुपी ५८० कर्मचाºयांची नियमितपणे आवश्यकता आहे.

मात्र, आरोग्य विभागाकडे एकूण ६२० कर्मचारी आहेत. म्हणजे शहराची पूर्णपणे स्वच्छता करण्याचीक्षमता आरोग्य विभागाकडे आहे, असा दावा राजर्षी शाहू विकासआघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांचा आहे. त्यामुळे त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागामार्फतच साफसफाई केली पाहिजे, असा आग्रह धरला आहे.

याउलट मात्र पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत साफसफाई करण्यासाठी आरोग्य खात्याकडे असलेल्या १३५ कर्मचाºयांना मूळ जागी रुजू होण्याची आवश्यकता असल्याचा अर्थ पालिका प्रशासनाने काढला आहे. त्यावरून मुख्याधिकारी पाटील यांनी १३५ कर्मचाºयांना आरोग्य खात्याकडे हजर होण्यासाठीचे आदेश बजावले आहेत.

मात्र, यातील बहुतांश कर्मचारी पालिकेच्या विविध विभागात महत्त्वाच्या कामावर कार्यरत असल्याने संबंधित विभागांचे कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा प्रकारे आता लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असे शीतयुद्ध सुरूअसल्याची चर्चा नगरपालिका वर्तुळात आहे.आयजीएमकडील कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी निवासस्थान मिळावेनगरपालिकेचे आयजीएम हॉस्पिटल शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. दवाखान्याची इमारत साफसफाई करण्यासाठी सध्या आयजीएमकडे कर्मचारी नसल्याने मागील आठवड्यात झालेल्या एका बैठकीत आमदार सुरेश हाळवणकर यांनी शासनाचे कर्मचारी मिळेपर्यंत आयजीएमच्या इमारतीची साफसफाई पालिकेच्या कर्मचाºयांनी करावी, असे निर्देश दिले. आयजीएमकडे साफसफाई करणारे कर्मचारी सध्या आयजीएमकडील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात राहत आहेत. तरी आयजीएमच्या सेवेत असेपर्यंत या कर्मचाºयांची त्याच ठिकाणी निवासस्थानाची व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलPoliticsराजकारण