इचलकरंजी जनता कर्फ्यूत दोन दिवस सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST2021-05-12T04:24:32+5:302021-05-12T04:24:32+5:30
शहरात दरवर्षी अक्षय्यतृतीया, महात्मा बसवेश्वर जयंती व रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र, सध्या कोरोनाच्या महामारीमुळे सण ...

इचलकरंजी जनता कर्फ्यूत दोन दिवस सूट
शहरात दरवर्षी अक्षय्यतृतीया, महात्मा बसवेश्वर जयंती व रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र, सध्या कोरोनाच्या महामारीमुळे सण साजरे करण्यास मर्यादा येत आहेत. या दिवशी मोठी उलाढाल होत असते. कोरोनामुळे यंदाही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या सणांदिवशी लागणारे मसाले पदार्थ, किराणा मालाची दुकाने व ईदच्या दिवशी मासांहार विक्रीची दुकाने यांना मोठी मागणी असते. यामुळे संबंधित आस्थापना जनता कर्फ्यूमधून दोन दिवस सूट देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्य्क्ष तानाजी पोवार यांच्याकडे करण्यात आली होती.
नगरसेवक रवींद्र माने, अमन बँकचे अध्यक्ष बादशाह बागवान, कैशभाई बागवान, सलीम अत्तार, समीर शेख, इम्तियाज म्हैशाळे, साद मोमीन, इम्रान मकानदार, युसुफ दुर्ग व सलीम ढालाईत यांनी केलेली मागणी मान्य करत प्रशासनाने सर्व नियमांचे काटेकोर पालन करून सण साजरे करण्याचे आवाहन केले आहे.