इचलकरंजीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ४५ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:33+5:302021-05-09T04:24:33+5:30
इचलकरंजी शहर व परिसरात कडक निर्बंध लागू करूनही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. तरीही काहीजण विनाकारण रस्त्यावरून फिरत आहेत. ...

इचलकरंजीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ४५ हजारांचा दंड वसूल
इचलकरंजी शहर व परिसरात कडक निर्बंध लागू करूनही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. तरीही काहीजण विनाकारण रस्त्यावरून फिरत आहेत. त्यामुळे नगरपालिकेसह पोलीस प्रशासनासमोर अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत कडक कारवाई सुरू केली आहे. शहराला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर नाकाबंदी केली असून अन्य जिल्ह्यांतून शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांकडून कडक तपासणी केली जात आहे. शनिवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी विनाकारण व मास्क न लावता कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६० मोटारसायकलवर कारवाई केली. यामध्ये एकूण ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यावेळी कोरोना नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे वाहतूक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अडसुळ यांनी सांगितले.