इचलकरंजीत कुत्र्याचा अनेकांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:27 AM2021-07-30T04:27:28+5:302021-07-30T04:27:28+5:30

रुग्णांचे हाल : लहान मुलांचाही समावेश लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील जवाहरनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास पंधराजणांचा चावा ...

Ichalkaranji dog bites many | इचलकरंजीत कुत्र्याचा अनेकांना चावा

इचलकरंजीत कुत्र्याचा अनेकांना चावा

Next

रुग्णांचे हाल

: लहान मुलांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील जवाहरनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास पंधराजणांचा चावा घेतला. यामध्ये चार ते पाच बालकांसह वयोवृद्ध नागरिक व महिलांचा समावेश आहे. त्या सर्वांना उपचारासाठी आयजीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र, कोरोना रुग्णांसाठी राखीव असल्याने त्यांना दाखल करून घेतले नाही. त्यामुळे रुग्णांनी उपचारासाठी सांगली येथील हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहरातील जवाहरनगर परिसरातील कुंभार गल्ली, वीर गल्ली, साई गल्ली, ज्योतिबा मंदिर परिसर या भागात भटक्या कुत्र्याने उच्छांद मांडला. या पिसाळलेल्या कुत्र्याने पंधराजणांचा चावा घेत त्यांना गंभीरपणे जखमी केले. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्यासुमारास घडली. यामध्ये चार ते पाच बालकांसह दोघा वयोवृद्धांसह महिलांचा समावेश आहे. जखमींना तत्काळ आयजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, आयजीएम हे कोरोना रुग्णांसाठी राखीव असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. त्यानंतर सर्वजण हातकणंगले येथील हॉस्पिटलमध्ये गेले असता, त्याठिकाणीही दाद मिळाली नाही. त्यामुळे रुग्णांनी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. काही दिवसांपूर्वी याच भागात असा प्रकार घडला होता. त्यावेळी भागातील संतप्त नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी नगराध्यक्षांना घेराव घातला होता. त्यावेळी हात झटकण्यात आले. कोरोना काळात अशा घटना घडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

फोटो ओळी

२९०७२०२१-आयसीएच-०२

२९०७२०२१-आयसीएच-०३

इचलकरंजीत पिसाळलेल्या कुत्र्याने महिला व बालकांचा चावा घेतला.

Web Title: Ichalkaranji dog bites many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.