शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Kolhapur: पंच्याहत्तर हजार रुपये लाचेची मागणी, इचलकरंजीतील नगर भूमापन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 18:48 IST

इचलकरंजी : शहापूर हद्दीतील दोन भूखंड एकत्रित करून देण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नगर भू-मापन अधिकारी दुष्यंत विश्वास ...

इचलकरंजी : शहापूर हद्दीतील दोन भूखंड एकत्रित करून देण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नगर भू-मापन अधिकारी दुष्यंत विश्वास कोळी (रा. इचलकरंजी, मूळ जयसिंगपूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, तक्रारदार आणि त्यांचे सहहिस्सेदार यांची शहापूर येथे गट नं. ४५४ सिटी सर्व्हे नं. १९०२१ मध्ये भूखंड क्र. २७, २८, २९ आणि ३० आहेत. त्यापैकी २७, २८ आणि २९, ३० हे भूखंड एकत्रित करून देण्यासाठी तक्रारदार यांनी नगर भू-मापन अधिकारी कार्यालयाकडे जुलै २०२४ मध्ये अर्ज केला होता. काही दिवसांनी या अर्जाबाबत कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता त्याने ही दोन्ही प्रकरणे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर कार्यालयाकडे पाठवून त्याची प्रत तक्रारदारास दिली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये संबंधित कर्मचाऱ्याने तक्रारदाराला तुमचे अर्ज जिल्हा कार्यालयातील ज्या टेबलावर आहेत, त्याचा पदभार माझ्याकडेच आहे, असे सांगत त्या अर्जावर मंजुरी आणण्यासाठी ३० हजार रुपये लागतील, असे सांगून वरिष्ठांसाठी लाचेची मागणी केली.त्यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता संबंधित कर्मचाऱ्याने वरिष्ठ नगर भू-मापन अधिकारी दुष्यंत कोळी यांना भेटण्यास सांगितले. तक्रारदार यांनी कोळी यांची भेट घेतली असता त्यांनी वरिष्ठांसाठी तक्रारदाराकडे ७५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने कोळी याला अटक करून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

लाच मागितल्याने कारवाईया प्रकरणात अधिकाऱ्याने थेट लाचेची रक्कम स्वीकारली नसली तरी पथकाने केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच पथकाच्या पडताळणीमध्ये अन्य कर्मचारी अथवा वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग आढळून आला नसल्याने फक्त दुष्यंत कोळी याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घराची झडती

नगर भू-मापन अधिकारी दुश्यंत कोळी याच्या अटकेनंतर पथकाने इचलकरंजी व जयसिंगपूर येथे त्याच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये आक्षेपार्ह काही हाती लागले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग