इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST2021-03-08T04:24:01+5:302021-03-08T04:24:01+5:30
इचलकरंजी : श्री गुरुदेव सेवा बहुउद्देशीय मंडळाच्यावतीने पाणपोईचा प्रारंभ करण्यात आला. उगमराज बोहरा व शैलेश बोरा यांनी फीत कापून ...

इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
इचलकरंजी : श्री गुरुदेव सेवा बहुउद्देशीय मंडळाच्यावतीने पाणपोईचा प्रारंभ करण्यात आला. उगमराज बोहरा व शैलेश बोरा यांनी फीत कापून याचे उद्घाटन केले. राजेंद्र बोरा यांनी स्वागत केले. यावेळी श्रीकांत चंगेडिया, सुभाष गुगळे, सुमतीलाल शहा, मनोज मुनोत यांच्यासह श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाचे सदस्य उपस्थित होते.
भाजप युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन
तारदाळ : येथे भाजप युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन राज्य भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले. सर्व युवा वर्गाला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करून राज्यभरात शाखांचे जाळे आम्ही तयार करणार असल्याचे पाटील यांनी केले. यावेळी पृथ्वीराज यादव, अनिल डाळ्या, प्रसाद खोबरे, अंजना शिंदे, संजय चोपडे, गजानन नलगे, सचिन पवार, आदी उपस्थित होते.