इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:27+5:302021-03-24T04:22:27+5:30
अनुराधा पाटील हिची निवड इचलकरंजी : सूर्यपेठ (तेलंगणा) येथे कुमारी गट कबड्डी स्पर्धेसाठी येथील गंगामाई गर्ल्स् हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी ...

इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
अनुराधा पाटील हिची निवड
इचलकरंजी : सूर्यपेठ (तेलंगणा) येथे कुमारी गट कबड्डी स्पर्धेसाठी येथील गंगामाई गर्ल्स् हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी अनुराधा अनिल पाटील हिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा आज, बुधवारी होत आहे. अनुराधा हिला मुख्याध्यापिका एस.एस.गोंदकर, उपप्राचार्य आर.एस.पाटील, पर्यवेक्षक एस.एस.भस्मे व क्रीडा विभागप्रमुख शेखर शहा यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी
२३०३२०२१-आयसीएच-०१ - अनुराधा पाटील
डीकेएएससी कॉलेजमध्ये कार्यशाळा
इचलकरंजी : डीकेएएससी कॉलेजमध्ये मराठी व हिंदी भाषेतील आव्हाने आणि रोजगाराच्या संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते. डॉ. नंदकुमार मोरे व प्रा. सुधाकर इंडी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. एस .बी .बेंद्रे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. अर्चना तराळ यांनी केले. प्रा. अंजली उबाळे यांनी आभार मानले.
शेताच्या बांधावर मिट्टी सत्याग्रह
इचलकरंजी : राष्ट्र सेवा दल, छात्रभारती व नारायण सुर्वे कवी मंचने शेतकरी बांधवांसमवेत शेताच्या बांधावर जाऊन मिट्टी सत्याग्रह केला. हातात माती घेऊन किसान एकता जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी संजय रेंदाळकर, रवींद्र पडवळे, रोहित दळवी, शरद वास्कर, आदी उपस्थित होते.