इचलकरंजी ३४ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:20 IST2021-07-17T04:20:52+5:302021-07-17T04:20:52+5:30

इचलकरंजी : शहरात शुक्रवारी विविध २५ भागांतील ३४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान झेंडा चौक येथील ८० वर्षीय ...

Ichalkaranji 34 positive, both died | इचलकरंजी ३४ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

इचलकरंजी ३४ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

इचलकरंजी : शहरात शुक्रवारी विविध २५ भागांतील ३४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान झेंडा चौक येथील ८० वर्षीय वृद्ध व हत्ती चौक येथील ६० वर्षीय वृद्धा यांचा मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये गावभाग ४, यशवंत कॉलनी ३, खंजिरे मळा, हत्ती चौक, जवाहरनगर, गणेशनगर, शहापूर प्रत्येकी २, कागवाडे मळा, गांधी कॅम्प, सांगली नाका, नारायण मळा, आसरानगर, सहकारनगर, राधाकृष्ण चौक, ज्ञानेश्वर गल्ली, गोकुळ चौक, महेशनगर, तीन बत्ती चौक, ढवळे गल्ली, भोनेमाळ, इंदिरानगर, बालाजीनगर, कृष्णानगर, आर. के. नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत आठ हजार ७१७ जणांना लागण झाली असून, सात हजार ९६० जण बरे झाले आहेत. ३७२ जण उपचार घेत असून, मृत्युसंख्या ३८५ वर पोहोचली आहे.

Web Title: Ichalkaranji 34 positive, both died