हातउसने पैसे परत मागणाऱ्या आईस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST2021-01-04T04:20:40+5:302021-01-04T04:20:40+5:30
कोल्हापूर : हातउसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून मोठ्या मुलाने आपल्या आईसह लहान भावाला काठीने व उसाने मारहाण करण्याचा ...

हातउसने पैसे परत मागणाऱ्या आईस मारहाण
कोल्हापूर : हातउसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून मोठ्या मुलाने आपल्या आईसह लहान भावाला काठीने व उसाने मारहाण करण्याचा प्रकार घडला. हा प्रकार तेरसवाडी (ता. करवीर) येथे घडला.
या घटनेत आई सुदाबाई केशव रायकर व भाऊ किरण केशव रायकर (वय ३१, दोघेही रा. तेरसवाडी) हे दोघे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी घडली.
याबाबत करवीर पोलीस ठाण्यात मुुलगा सागर केशव रायकर व त्याची पत्नी वैशाली सागर रायकर (दोघेही रा. तेरसवाडी) या संशयितांवर गन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर व किरण हे दोघे सख्खे भाऊ असून आपापल्या कुटुंबासह विभक्त, पण गावातच राहतात. यामध्ये सुदाबाई रायकर यांनी आपला मोठा मुलगा सागर याला गतवर्षी हातउसने एक लाख ८३ हजार रुपये दिले होते. त्यापैकी ५० हजार रुपये परत मागण्याच्या कारणावरून वाद उफाळला. सागर व त्याच्या पत्नीने आई सुदाबाई यांना शिवीगाळ केली. त्याचवेळी सागरच्या पत्नीने रागाच्या भरात हातातील उसाच्या बुडक्याने सुदाबाई यांना मारहाण केली. त्यावेळी वाद सोडविण्यासाठी आलेला लहान मुलगा किरण यालाही सागरने काठीने मारहाण केली. या हल्ल्यात सुदाबाई व किरण हे दोघे जखमी झाले. त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
याबाबत किरण रायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करवीर पोलीस ठाण्यात सागर व त्याची पत्नी वैशाली रायकर यांच्यावर गुन्हा नोंदवला.