शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

अर्धा कप पाण्यात चार बिस्किटे बुडवून खाल्ली अन् दिवस काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 6:41 PM

EverestGirl Kolhapur : खाण्याचे अन्न आणि पाणी तयार करण्यासाठी इंधनही संपल्याने नाईलाजाने परतीचा मार्ग धरावा लागला. परत येताना देखील अर्धा कप पाण्यात चार बिस्किट बुडवून खात दिवस काढावा लागला. इंधन संपल्याने बर्फापासून पाणीही तयार करता येत नसल्याने अर्धा लिटर पाण्यात चौघांची तहान भागवावी लागली असा एव्हरेस्ट प्रवासातील थरारक अनुभवांचा पट गिर्यारोहक कस्तूरी सावेकर हिने गुुरुवारी येथे पत्रकार परिषदेत उलगडला.

ठळक मुद्देकस्तूरी सावेकरची एव्हरेस्ट कहाणी हवामानावर मात करून पुढील वर्षी नक्कीच एव्हरेस्ट सर करणार

कोल्हापूर : खाण्याचे अन्न आणि पाणी तयार करण्यासाठी इंधनही संपल्याने नाईलाजाने परतीचा मार्ग धरावा लागला. परत येताना देखील अर्धा कप पाण्यात चार बिस्किट बुडवून खात दिवस काढावा लागला. इंधन संपल्याने बर्फापासून पाणीही तयार करता येत नसल्याने अर्धा लिटर पाण्यात चौघांची तहान भागवावी लागली असा एव्हरेस्ट प्रवासातील थरारक अनुभवांचा पट गिर्यारोहक कस्तूरी सावेकर हिने गुुरुवारी येथे पत्रकार परिषदेत उलगडला.

नेपाळमध्ये काठमांडूला विमानतळावरून सुरू झालेला वातावरणाशी संघर्ष एव्हरेस्टच्या बेस कॅम्प तीनवर पोहचेपर्यंत सुरूच होता. शेवटची चौथ्या कॅम्पवरची चढाई करण्याची मानसिक तयारी होती, पण प्रचंड गार वारे, बर्फाच्या वादळासमोर टेन्टचाही टिकाव लागू शकला नाही.हवामानाची योग्य साथ न मिळाल्याने एव्हरेस्ट मोहीम पुढील वर्षी नव्या हिमतीने पूर्ण करायची हा निश्चय करत कोल्हापुरात परत आलेल्या कस्तूरी सावेकर हिने गुरुवारी माध्यमांसमोर मोहिमेचा थरारक अनुभव कथन केला.

यावेळी गिरिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष व कस्तूरीचे प्रमुख मार्गदर्शक उमेश झिरपे, एव्हरेस्ट सर केलेले आशिष माने व जितेंद्र गवारे यांनीही या मोहिमेचा खडतर प्रवास मांडला. करवीर हायकर्सचे अध्यक्ष दीपक सावेकर, अमर अडके यांची प्रमुख उपस्थिती होती.मार्गदर्शक उमेश झिरपे यांनीही कस्तूरी अगदी लहान वयात मोठे ध्येय गाठण्याची क्षमता राखणारी मुलगी आहे, तिने अनेक खडतर प्रसंग अनुभवले आहे, त्यातून तिचे मानसिक बळ वाढणार आहे, हेच तिला पुढील मोहिमेत कामी येणार आहे, असे सांगितले.

टॅग्स :Everestएव्हरेस्टTrekkingट्रेकिंगkolhapurकोल्हापूर