I also launched Gadge Baba Abhiyan on the occasion of Lok Sant Gadge Baba Jayanti in Kolhapur | कोल्हापूरमध्ये गाडगेबाबा जयंतीनिमित्त मी सुद्धा गाडगेबाबा अभियान

कोल्हापूरमध्ये गाडगेबाबा जयंतीनिमित्त मी सुद्धा गाडगेबाबा अभियान

ठळक मुद्देकोल्हापूरमध्ये गाडगेबाबा जयंतीनिमित्त मी सुद्धा गाडगेबाबा अभियानघराघरातून संकलित करण्यात आला प्लास्टिक कचरा

कोल्हापूर  : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मी सुद्धा गाडगेबाबा अभियान संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये राबवण्यात आपले. कोल्हापूर अर्थ वॉरीअर्स व कोल्हापूर महानगरपालिका यांनी या अभियानाचे आयोजन केले होते. स्वयंप्रभा मंच सह-आयोजक होते.

'प्लास्टिकमुक्त कोल्हापूर' चा नारा देत टाकाळा, साईक्स एक्स्टेन्शन, शाहूपुरी पूर्व भाग आणि राजारामपुरी या परिसरात घराघरातून प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. कचरा संकलित करण्यासाठी स्वयंप्रभातर्फे या परिसरात विशेष वाहन फिरवण्यात आले.
 सोबत वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन, कमला कॉलेज एनएसएस विभाग व स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. मी गाडगेबाबा अभियानास परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

अभियानात अक्षय निरोखेकर, सुहास वायंगणकर, वसिम सरकावस, ऐश्वर्या पाटील, सचिन पोवार, सतीश कोरडे, मनिष कोळेकर, शुभदा हिरेमठ, कल्याणी बोरकर, अश्विनी पाटील, हेमलता बोरकर, अमोल बुढ्ढे, शिवमं जाधव, ओंकार घाटगे , रोहित भोसले , ऐश्वर्या पाटील अक्षय कांबळे, सागर बकरे, तात्या गोवावाला, सविता साळोखे, शीतल तांबेकर या शिलेदारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता तर या अभियानास कोल्हापूर अर्थ वॉरीअर्सचे सुबोध भिंगार्डे, अभिजीत कुलकर्णी, युवराज गुरव, केदार मुनिश्वर, आदिती गर्गे, तृप्ती देशपांडे, उदय गायकवाड, परितोष उरकुडे, आशिष कोंगळेकर यांचे सहकार्य लाभले.

मी गाडगेबाबा’ या अभियानास परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. कचरा संकलित करण्यासाठी स्वयंप्रभा मंचतर्फे या परिसरात विशेष वाहन फिरवण्यात आले. लोकसंत गाडगेबाबा यांना नागरिकांनी कृती कार्यातून विनम्र आभिवादन केले. 
-सारिका बकरे
संस्थापिका- स्वयंप्रभा मंच

Web Title: I also launched Gadge Baba Abhiyan on the occasion of Lok Sant Gadge Baba Jayanti in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.